‘ई-व्हेइकल’साठी प्रोत्साहन

Evehicle
Evehicle

पुणे - केंद्र सरकारकडून इलेक्‍ट्रिक वाहने (ई-व्हेइकल) वापरण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. त्या दृष्टीने महापालिकेनेही आता तयारी सुरू केली आहे. इलेक्‍ट्रिक वाहनांसाठी लवकरच पालिकेच्या आवारात चार्जिंग स्टेशन उभारली जाणार आहेत.

वाहनांतील धुरामुळे वायुप्रदूषण होते. ते कमी करण्यासाठी सीएनजीवरील वाहनांचा पर्याय समोर आला. शहारात पीएमपी बससह खासगी वाहने सीएनजीवर धावत आहेत. रिक्षाचालकांनी सीएनजी वापरासाठी महापालिकेकडून प्रोत्साहन दिले जाते. प्रदूषण रोखण्यासाठी पेट्रोल-डिझेलच्या गाड्यांऐवजी ‘ई-व्हेइकल’कडे नागरिकांचा ओढा वाढत आहे.

महापालिकेकडे सध्या बोटावर मोजण्याइतकी ‘ई-व्हेईकल’ आहेत. परंतु, भाडेतत्त्वावर ५० ‘ई-कार’ घेण्याचे नियोजन व्हेईकल डेपो विभागाकडून सुरू आहे. त्यासाठी अंदाजपत्रकात १ कोटी रुपयांची तरतूद असून, निविदा प्रक्रियाही राबविण्यात आली होती. पण, सध्या आचारसंहितेमुळे ‘ई-कार’ घेण्यास ब्रेक लागला आहे.

महापालिकेच्या विद्युत विभागाकडून ‘ई-व्हेईकल’साठी चार्जिंग स्टेशन सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रस्ताव तयार केला असून, तो सरकारी कंपनी ‘ईईएसएल’कडे पाठविला जाणार आहे. या कंपनीकडून महापालिकेच्या आवारात दोन, तर व्हेईकल डेपोमध्ये एक, असे एकूण तीन चार्जिंग स्टेशन उभारली जाणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com