बारामतीत तिसऱ्या दिवशी अतिक्रमणांवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

बारामती शहर - नगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने कारवाईचा धडाका लावला आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी शहरातील इंदापूर रस्त्यावरील अतिक्रमणे काढून टाकली गेली. 

वाहतूक कोंडी व पादचाऱ्यांना चालणेही अवघड करणाऱ्या अतिक्रमणांबाबत माध्यमांनी आवाज उठविल्यानंतर आता नगरपालिका प्रशासनानेही याची गंभीर दखल घेत कारवाई सुरू केली आहे. नवीन मुख्याधिकारी योगेश कडूसकर यांनीही कारवाईला पाठिंबा देत आज प्रशासनाला काही सूचना केल्या. 

बारामती बस स्थानकासमोरील अतिक्रमणे आज सुनील धुमाळ व राजेंद्र सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील अतिक्रमण निर्मूलन विभागाने काढून टाकली. यात फळांचे गाडे, टपऱ्या व पदपथांवर सुरू असलेल्या व्यवसायांचा समावेश होता.  

दरम्यान, बारामती शहरातील अतिक्रमण विरोधी मोहीम ही सातत्याने चालणार असल्याची माहिती नगरपालिका सूत्रांनी दिली.

रस्ते रिकामे ठेवण्यावर भर
वर्दळीच्या ठिकाणचे रस्ते वाहतुकीसाठी खुले राहतील, रस्त्यांवर अतिक्रमण होणार नाही, याची काळजी नगरपालिका प्रशासन घेत आहे. वाहतूक पोलिसांनीही अस्ताव्यस्त पार्किंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई सुरू केली आहे. जेथे पक्‍क्‍या स्वरूपाचे अतिक्रमण आहे, ते आता पुढील टप्प्यात पाडून जागा रिकामी करण्यावर हा विभाग भर देणार आहे.

Web Title: encroachment crime