इंदापुरात 23 टपऱ्या हटविल्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 मे 2018

इंदापूर - इंदापूर नगर परिषद क्षेत्रातील अतिक्रमणे हटविण्यास बुधवारी (ता. १६) सुरवात करण्यात आली. प्रशासकीय इमारतीसमोरील आठ, तर इंदापूर न्यायालय रस्त्यालगतच्या १५ टपऱ्या हटविण्यात आल्या. नगर परिषदेचे अतिक्रमणविरोधी पथकप्रमुख सुजय मखरे, सहदेव व्यवहारे, अनिल कुंभार व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. पोलिस उपनिरीक्षक सुशांत किणगे, अमोल ननावरे; तसेच पोलिस पथक या वेळी उपस्थित होते. 

अनेक टपरीधारकांनी नगर परिषदेची कारवाई सुरू झाल्यानंतर स्वत:हून अतिक्रमण काढले, तर काहींनी शहरातून जाणाऱ्या सोलापूर महामार्गावरील अतिक्रमणे हटवा, नंतर आमची अतिक्रमणे हटवा अशी भूमिका घेतली. मात्र, नगर परिषदेने त्यास न जुमानता कारवाई केली.  

शहरातील सर्व अतिक्रमणधारकांची यादी करून त्यांचे नगर परिषदेच्या मालकीच्या जागेत पुनर्वसन करावे, अशी मागणी या वेळी टपरीधारकांनी केली. शहरातील वाहतूक कोंडी व अतिक्रमण हटविण्यासाठी ‘सकाळ’ने वेळोवेळी पाठपुरावा केला.   याबाबत नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामनिवास झंवर म्हणाले, की शहरातून जाणारा जुना सोलापूर महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात आहे. हा रस्ता अद्याप नगर परिषदेकडे हस्तांतरित झालेला नाही. मात्र, या रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यासाठी सहकार्य केले जाईल.

Web Title: encroachment crime