उद्यानाच्या जागेवर अतिक्रमण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 जून 2018

पिंपरी - चिंचवड औद्योगिक वसाहतीमधील आयुर्वेदिक वनौषधी उद्यानाच्या जागेवर खासगी प्रवासी कंपन्यांनी अतिक्रमण केले आहे. याबाबत महापालिका आणि एमआयडीसी प्रशासन एकमेकांकडे बोट दाखवीत आहे. 

चिंचवड औद्योगिक वसाहतीमधील डी-टू ब्लॉकमध्ये सुमारे दोन एकर जागेवर वनौषधी उद्यान आहे. उद्यानाच्या मोकळ्या जागेत वृक्षारोपण करण्यात येणार आहे; परंतु त्या जागेवर खासगी प्रवासी कंपन्यांच्या बस उभ्या केल्या जात आहेत. काही बस तर थेट उद्यानातील वनस्पतींना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीच्या काठावर थांबवितात. 

या जागेत काही जुन्या नादुरुस्त बसही उभ्या असतात; तसेच रस्त्याच्या कडेला काही भंगार बस, मिनी बस उभ्या आहेत. त्याकडे कोणाचेही लक्ष नाही. या उद्यानाला पूर्वी तारेचे कुंपण होते; परंतु चोरट्यांनी लोखंडी तारा चोरून नेल्या. त्यामुळे आता सिमेंट काँक्रीटची सीमाभिंत बांधण्याचे नियोजन असल्याचे सूत्रांनी सांगितले. सीमीभिंत नसल्याने उद्यानातील वनस्पतींच्या अस्तित्वालाही धोका संभवतो.

या मार्गावरून मालाची वाहतूक करणाऱ्या ट्रकची ये-जा असते. त्यामुळे रात्रीच्या वेळी अपघाताचा धोका संभवतो.

याबाबत महापालिकेच्या उद्यान विभागाचे मुख्य उद्यान अधीक्षक सुरेश साळुंके म्हणाले की, उद्यानाचा ताबा एमआयडीसीकडे आहे.

एमआयडीसीच्या एकूण ५३ खुल्या जागांपैकी ४३ जागा महापालिकेकडे हस्तांतरित केल्या आहेत. चिंचवड एमआयडीसीतील उद्यान आमच्या ताब्यात नाही.
- एस. एस. मलाबादे, कार्यकारी अभियंता, एमआयडीसी

Web Title: Encroachment on the park place