पुणे - हडपसर येथे अतिक्रमण हटाव आंदोलन

संदिप जगदाळे
शनिवार, 21 एप्रिल 2018

हडपसर (पुणे) : फोष फांउडेशन व हांडेवाडी रस्त्यावरील हौसिंग सोसायट्या यांच्यावतीने अतिक्रमण हटविण्या बाबतच्या मागणीसाठी हडपसर-मुंढवा सहाय्यक आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी रविपार्क ते सहाय्यक आयुक्त कार्यालय दरम्यान पदयात्रा काढून वाढलेल्या अतिक्रमणा विरोधात महापालिकेचा विरोधात निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. वेळोवेळी निवेदने देवूनही ढिम्म महापालिका प्रशासनाने कोणतीच कारवाई केली नसल्याने नागरिकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. 

अखेर पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर प्रभारी सहाय्यक आयुक्त सुनिल यादव यांच्याशी शिष्टमंडळाने चर्चा केली. त्यानंतर लेखी अश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. शिष्टमंडळात फोष चे अध्यक्ष वैभव माने, विकास रैना, रशिद अत्तार, महेश पवार, संतोष रणावरे, अपेक्षा केळकर, मोहन जीनेलू, राजेश सोनाळेकर उपस्थित होते. यावेळी नगरसेवक योगेश ससाणे व माजी नगरसेवक फारूख इनामदार, डॉ. शंतून जगदाळे, महोल्ला कमिटी कार्याध्यक्ष ओम करे यांनी या मोर्चाला पाठींबा दिला.

वैभव माने म्हणाले, नागरिक टॅक्स भरतात, त्यांना चांगल्या सेवा-सुविधा पालिकेने दयायला हव्यात. हांडेवाडी रसत्यावरी भाजी मंडई हटवावी. सय्यदननगर रेल्वे गेटच्या दुर्तफा एक किलोमिटर अंतरावरील  अतिक्रमणे हटवावीत. तसेच या मार्गावर वाहतूक कोंडी होवू नये यासाठी नो हॅाकर्स झोन व नोपार्कींग झोन करावा. स. न. 57 व 53 मधील अतिक्रणे, अनअधिकृत बांधकाम , गायराण जागेवीरील अतिक्रमणे हटवावीत. जैन टाउनशिप ते रवीपार्क या रस्त्यावरील अतिक्रमणे, शेड, कमान, गॅरेज आणि पदपखथावीरवल गाडया हटवाव्यात. महमदवाडी ते कृष्णानगर रस्ता रूंदीकरण करावे. रूणवाल व अशोकनगर सोसायटीनगर बाजूचे अतिक्रमणे हटवावीत. तसेच प्रभागात नियमित व पुरेसा पाणी पुरवठा व्हावा, आदी आमच्या मागण्या आहेत.

सहाय्यक आयुक्त सुनिल यादव म्हणाले, आमच्या स्तरावरील विषय आम्ही 20 दिवसात मार्गी लावू तसेच अन्य विभांशी संबधीत विषय त्या विभागांना कळवू असे लेखी अश्वासन आम्ही मोर्चातील शिष्टमंडळाला दिले आहे. 

Web Title: Encroachment removed movement at Hadapsar pune