सातारा मार्गावरील अतिक्रमणे हटविली

सातारा मार्गावरील अतिक्रमणे हटविली

खेड-शिवापूर -  पुणे-सातारा रस्त्यावर वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (एनएचएआय) अखेर मुहूर्त सापडला. ‘एनएचएआय’च्या पेट्रोलिंग पथकाने शुक्रवारी खेड-शिवापूर परिसरातील रस्त्यावर अडथळा ठरणाऱ्या टपऱ्या, दुकाने आणि फलक हटविले.

शिंदेवाडी ते सारोळादरम्यान रस्त्याच्या दुतर्फा अनेक छोट्या व्यावसायिकांनी अतिक्रमण केले होते. अनेक ठिकाणी चहा, नीरा, रसवंतीच्या टपऱ्या उभारण्यात आल्या होत्या. या टपऱ्यांवर येणाऱ्या ग्राहकांची वाहने मुख्य रस्त्यावर उभी राहत असल्याने वाहतुकीस अडथळा येत होता. तसेच, रस्त्याच्या रखडलेल्या रुंदीकरणाच्या कामातही या अतिक्रमणांचा अडथळा होता. या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून या ठिकाणी असलेल्या टपऱ्या, फ्लेक्‍स आदी अतिक्रमणे हटविण्याची मागणी होत होती. अखेर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने शुक्रवारपासून या रस्त्यावर अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटविण्यास सुरवात केली. पेट्रोलिंग पथकाने शुक्रवारी कात्रज नवीन बोगदा ते खेड-शिवापूर टोल नाक्‍यादरम्यानची रस्त्याच्या दुतर्फा असलेली सुमारे दोनशे अतिक्रमणे हटविली. शनिवारी टोल नाक्‍यापुढील रस्त्यावर अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटविण्यात येणार आहेत. अमित भाटिया, बद्रिप्रसाद शर्मा, संकेत गांधी, अभिजित गायकवाड, आकाश चोरघे, सुधीर पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com