घारीच्या स्थलांतराचा अभ्यास

घारीच्या स्थलांतराचा अभ्यास
Published on: 

पाच महिन्यांत खंडांपार भरारी
तुर्कियेतील इग्दिर येथून ‘एंडर’ नावाच्या घारीने अवघ्या १४८ दिवसांत आशिया खंडातून आफ्रिकेपर्यंत ६,०४१ किलोमीटरचा प्रवास केला आहे. त्याच्या पाठीवर बसवलेल्या सहा ग्रॅम वजनाच्या उपग्रह संदेशवहन यंत्राद्वारे संशोधकांनी त्याच्या प्रवासाचा मागोवा घेतला. १४ मे २०२६ रोजी या पक्ष्याला संदेशवहन यंत्र बसवून आकाशात सोडण्यात आले. त्यानंतर त्याने रशियातील माखाचकला येथे उन्हाळा व्यतित केला आणि पुढे स्थलांतर करत नऊ ऑक्टोबर रोजी इथिओपियामध्ये प्रवेश केला. या प्रवासात त्याने चौदा देश ओलांडले. सहारा वाळवंटावरून उड्डाण करताना त्याने सलग १३ तासांत ४७८ किलोमीटर अंतर पार केले. पक्ष्यांचे स्थलांतराचे मार्ग, उड्डाणाचा वेग, उंची आणि विश्रांतीची ठिकाणे यांचा अभ्यास करण्यासाठी संदेशवहन यंत्राची मदत घेतली. त्यातून पक्ष्यांचे संरक्षण आणि त्यांच्या अधिवासांचे संवर्धन करण्यासाठी महत्त्वाची माहिती मिळते.
---------
सहा हजार किलोमीटर प्रवास
‘एंडर’ नावाच्या घारीने सुमारे पाच महिन्यांत आशिया खंडातून आफ्रिका खंडापर्यंत सहा हजार किलोमीटरहून अधिक (३,७०० मैलांहून अधिक) अंतर पार केले.
१४ मे २०२६ रोजी संदेशवहन करणारे यंत्र बसविले
पाच महिन्यांतील प्रवास :
- प्रवासाचे अंतर : ६,०४१ किलोमीटर (३,७५४ मैल)
- सर्वाधिक उंची : ४,५१५ मीटर (१४,८१३ फूट)
- कमाल वेग : ताशी १०२ किलोमीटर (६३ मैल)
नकाशातील ठिकाणे :
इग्दिर (तुर्किये), जॉर्जिया, आर्मेनिया, अझरबैजान, रशिया, कॅस्पियन समुद्र, सीरिया, लेबनॉन, इराक, इराण, जॉर्डन, कुवेत, सौदी अरेबिया, कतार, संयुक्त अरब अमिराती, ओमान, लाल समुद्र, इथिओपिया, इरिट्रिया, सुदान, येमेन, सोमालिया, जिबूती आणि ओरोमिया.
(स्रोत : कुजेयडोगा सोसायटी, अरास पक्षी संशोधन व शिक्षण केंद्र)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com