ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटातील जखमी संगणक अभियंत्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 जून 2018

पुणे : महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरचा स्फोट होऊन झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रियांका झगड़े या संगणक अभियंता मुलीने अखेर शनिवारी सकाळी साडेसहा वाजन्याच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. तर याच घटनेतील दूसर्या जखमी संगणक अभियंत्याचेही वर्धा येथे शुक्रवारी सकाळी निधन झाले. गरीब कुटुंबातुन आलेली आणि कुटुंबाचा आधार बनु पाहणार्या या दोन  तरुणाना आपला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना पुण्यात घडली. 

खराडी येथील इवॉन आयटी पार्कमधील एका आयटी कंपनीबाहेर रस्त्यावर असलेल्या खाद्यपदार्थच्या स्टॉलवर प्रियांका व तिचा मित्र चहा घेण्यास गेले होते. तेथे जवळच असलेल्या महावितरण कंपनीच्या ट्रांसफॉर्मरचा अचानक स्फोट झाला. त्यातील आगीचे लोळ तेथे थांबलेल्या प्रियांका व तिच्या मित्राच्या अंगावर पडले. त्यामध्ये दोघेही गंभीर भाजले.त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णलयात दाखल करण्यात आले. 

दरम्यान उपचारासाठीचा खर्च मोठ्या प्रमाणात येत होता. प्रियांका व तिच्या मित्राची दोघाचीही कौटुंबिक परीस्थिती नाजुक होती. उपचाराचा खर्च झेपत नसल्याने अखेर तरुणाच्या कुटुंबियाने त्यास वर्धा येथील त्याच्या गावाकडे हलविले. दरम्यान त्याचा काल सकाळी मृत्यु झाला.

प्रियांकाची परीस्थिती हालाखिची आहे.घरी आई-वडील व भाउ आहे. भाउ ड्रायव्हर म्हणून काम करतो. घरी 2 एकर शेती आणि चहाची टपरीद्वारे वडील कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. पोटाला चिमटा घेऊन अभ्यासात हुशार असलेल्या प्रियांकाला बी.ई पर्यन्तचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. प्रियांका नोकरीला लागुन कुटुंबाचा आधारवड होईल, अशी कुटुंबाची अपेक्षा होती. त्यानुसार ती काही महिन्यापूर्वीच खराडीतील आयटी कंपनीमध्ये कामाला लागली होती. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते. 

प्रियांकावर उपचार सुरु असताना तिच्या कुटुंबाने खर्च भागविन्यासाठी अनेकांच्या दाराचे उंबरे झिजविले. मिलाप ही कंपनी वगळता सगळ्यानीच हात वर केले. 

महावितरण कंपनीने घटना घडल्यानंतर लगेचच आपल्या अधिकारी वर्गाला घटनास्थली पाठवून अहवाल तयार केला होता. त्यामध्ये ट्रांसफॉर्मरचा स्फोट झाला नसुन खाद्यपदार्थच्या गाडीवर असलेल्या गैसचा स्फोट होउन ही घटना घडली असल्याची सारवासारव करुन आपले हात झटकले आहेत. त्यामुळे दोन तरुणाच्या मृत्युस जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

Web Title: engineer dies who injured from transformer spot