पुणे - वाकडमध्ये इंजिनिअरची आत्महत्या 

संदीप घिसे 
सोमवार, 2 एप्रिल 2018

पिंपरी (पुणे) : राहत्या घरात पिस्तुलातून गोळी मारून घेत सीनियर इंजिनिअरने आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (ता.२) सकाळी नऊच्या सुमारास वाकड येथे उघडकीस आली.

आनंद बळवंत वासुदेव यादव (वय ३५, रा. रिदम सोसायटी, वाकड) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. ते एनव्हीआयडीए या कंपनीत कामाला होते. आनंद यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात त्याने  माझ्या मृत्युस कोणाला जबाबदार धरु नये, असे नमूद केले आहे.

आनंद यांचा घटस्फोट झाला होता. त्यांना नैराश्य आल्याने ते उपचारही घेत होते. त्यांचे वडिल ठाण्यामध्ये बांधकाम व्यवसायिक आहेत. आत्महत्येसाठी ज्या पिस्तूलाचा वापर करण्यात आला. त्याचा परवाना आहे किंवा नाही, याचा तपास वाकड पोलिस करत आहेत.

Web Title: engineer suicide in wakad pune