अभियांत्रिकी प्रवेशाबाबत मार्गदर्शन 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जानेवारी 2017

पुणे - सकाळ विद्या आणि एसआरएम विद्यापीठ, चेन्नई तर्फे अभियांत्रिकी क्षेत्रातील संधींबाबत विशेष चर्चासत्राचे आयोजन केले आहे. येत्या शनिवारी (ता. 7) कोथरूड येथील पुण्याई सभागृहात हे चर्चासत्र होईल. इंजिनिअर होण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी ही कार्यशाळा कमालीची महत्त्वाची ठरणार आहे. 

पुणे - सकाळ विद्या आणि एसआरएम विद्यापीठ, चेन्नई तर्फे अभियांत्रिकी क्षेत्रातील संधींबाबत विशेष चर्चासत्राचे आयोजन केले आहे. येत्या शनिवारी (ता. 7) कोथरूड येथील पुण्याई सभागृहात हे चर्चासत्र होईल. इंजिनिअर होण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी ही कार्यशाळा कमालीची महत्त्वाची ठरणार आहे. 

पाल्यांच्या इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनबाबत पालकांच्या मनात अनेक शंका असतात. विद्यार्थ्यांनाही काही प्रश्‍न सतावत असतात. त्या प्रत्येक शंकांचे याठिकाणी समाधान केले जाणार आहे. याशिवाय अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या भविष्यातील संधी, विद्यार्थ्यांच्या समस्या, विद्यापीठातर्फे दिली जाणारी स्कॉलरशिप आणि राबविण्यात येणारे प्लेसमेंट शिबिर, प्रवेशपरीक्षा अशा प्रत्येक टप्प्यांवरच्या प्रश्‍नांवर चर्चा होणार आहे. 

सर्व प्रश्‍नांची उत्तरे मिळावीत म्हणून "सकाळ'ने डॉ. लीनस मार्टिन (विभाग प्रमुख, ऑटोमोबाईल विभाग, एसआरएम युनिव्हर्सिटी) या शिक्षण तज्ज्ञांसोबत विशेष चर्चासत्र आयोजित केले आहे. यासाठी उपस्थित राहणाऱ्या 12वीच्या विद्यार्थ्यांनी कॉलेजचे आयकार्ड दाखविल्यास त्यांना एसआरएम युनिव्हर्सिटीचे 1 हजार 70 रुपये किमतीचे प्रॉस्पेक्‍ट्‌स व ऍप्लिकेशन फॉर्म मोफत दिले जाईल. 

विद्यार्थी आणि पालकांना सोप्या भाषेत प्रवेश प्रक्रिया समजावी म्हणून मार्गदर्शक हेमचंद्र शिंदे हे इंजिनिअरिंगमधील प्रवेशप्रक्रियेबाबत विशेष मार्गदर्शन करणार आहेत. 12 वीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असून, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल. 

शनिवार 7 जानेवारी । वेळ : सकाळी 10.30 
स्थळ : पुण्याई सभागृह, एमआयटी शाळेसमोर, पीएनजी शोरुमजवळ, पौड रस्ता, कोथरूड, पुणे 
12 वीचे विद्यार्थी व पालकांसाठी प्रवेश विनामूल्य 

जागा : 500 जागांची मर्यादा 
प्रवेश : एक विद्यार्थी व सोबत एक व्यक्‍ती 
- ऑनलाइन रजिस्ट्रेशन सुरू ! 
- आजच www.vidyaseminars.com येथे रजिस्ट्रेशन करा 
- संपर्क ः 9922913510 

Web Title: Engineering guidance regarding admission