अभियांत्रिकीची ऑनलाइन परीक्षा बंद; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 जानेवारी 2020

प्राध्यापकांच्या जबाबदारीत वाढ
महाविद्यालय स्तरावर अंतर्गत गुणांसाठी ऑफलाइन परीक्षा घेताना संबंधित विद्यार्थ्याची रुची कशामध्ये आहे, हे पाहून लेखी परीक्षा घ्यायची की प्रकल्प करायला लावून त्यावर गुण द्यायचे किंवा एकत्रित कामगिरीवर गुण द्यायचे, हे संबंधित महाविद्यालयाला ठरविता येणार आहे, त्यामुळे प्राध्यापकांची जबाबदारी वाढणार आहे.

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी अभ्यासक्रमासाठी क्रेडिट सिस्टिम लागू केल्याने २०२०-२१ मध्ये अभियांत्रिकी आणि एमबीएच्या द्वितीय वर्षाच्या परीक्षा पद्धतीमध्ये बदल केला जाणार आहे. या दोन्ही अभ्यासक्रमांसाठी प्रत्येक सत्राला असलेली ऑनलाइन परीक्षा बंद करून त्याऐवजी अंतर्गत गुणांसाठी महाविद्यालय स्तरावर परीक्षा घेतली जाणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षासाठी सध्या ५० गुणांची लेखी; तर ५० गुणांची ऑनलाइन परीक्षा घेतली जाते, तर एमबीएच्या ८० गुणांची लेखी परीक्षा, तर २० गुणांची ऑनलाइन परीक्षा घेण्यात येते. ऑनलाइन परीक्षेचे कंत्राट दिलेल्या ठेकेदाराची मुदत संपल्याने नवीन ठेकेदार नेमण्याच्या प्रक्रियेत अभियांत्रिकी व एमबीएच्या प्रथम सत्राच्या परीक्षांना विलंब झाला, त्या परीक्षा आता सुरू आहेत.

आम्ही करू शरद पवारांचे संरक्षण - महाराष्ट्र केसरी आप्पासाहेब कदम

पुणे विद्यापीठाने २०१९ मध्ये अभियांत्रिकीचा संपूर्ण अभ्यासक्रम बदलला, त्यामध्ये प्रथम वर्षासाठी ऑनलाइन परीक्षा रद्द करण्यात आली आहे. सध्या केवळ द्वितीय वर्षासाठी ऑनलाइन परीक्षा घेतली जात आहे. मे महिन्यात होणाऱ्या द्वितीय सत्राच्या ऑनलाइन परीक्षा संपल्यानंतर ही पद्धत बंद केली जाणार आहे, तर एमबीएलाही ऑनलाइन परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: engineering online exam close by Pune University decision