अभियंत्यांनी भावनांक वाढविणे गरजेचे - डॉ. वेंकटेश्वरन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

‘संपूर्ण जगच नव्या बदलाच्या अवस्थेत आहे. या प्रक्रियेचा वेग प्रचंड आहे. अभियंत्यांना हे आव्हान स्वीकारताना स्वतःमध्ये काही बदल करून घेणे गरजेचे आहे. मुळात तुम्हाला भावनांक (इमोशनल कोशंट) वाढविणे गरजेचे आहे. स्पर्धेच्या युगात तुम्हाला तणावपूर्ण क्षणाला सामोरे जावे लागू शकते. पण, याच ताणाला तुम्हाला सकारात्मक नजरेने हाताळता आले पाहिजे,’’ असे मत ‘पर्सिस्टंट’चे उपसंचालक डॉ. आर. वेंकटेश्वरन यांनी व्यक्त केले.

पुणे - ‘संपूर्ण जगच नव्या बदलाच्या अवस्थेत आहे. या प्रक्रियेचा वेग प्रचंड आहे. अभियंत्यांना हे आव्हान स्वीकारताना स्वतःमध्ये काही बदल करून घेणे गरजेचे आहे. मुळात तुम्हाला भावनांक (इमोशनल कोशंट) वाढविणे गरजेचे आहे. स्पर्धेच्या युगात तुम्हाला तणावपूर्ण क्षणाला सामोरे जावे लागू शकते. पण, याच ताणाला तुम्हाला सकारात्मक नजरेने हाताळता आले पाहिजे,’’ असे मत ‘पर्सिस्टंट’चे उपसंचालक डॉ. आर. वेंकटेश्वरन यांनी व्यक्त केले.

ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित ‘इंजिनिअरिंग टुडे’ उपक्रमाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. 

टेक्‍निकल स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांचा विकास होत असतो आणि त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात. 

विचारांच्या आदान-प्रदानातून सर्जनशीलता वाढीला लागत असल्याचे त्यांनी सांगितले.’’

‘थरमॅक्‍स’चे व्यवस्थापक रॉकी अल्वारेस म्हणाले, ‘‘शैक्षणिक संस्था आणि उद्योग समूह यांच्यातील संवाद वाढायला हवा. उद्योग समूहाच्या गरजा शैक्षणिक संस्थांनी समजावून घेऊन त्या पद्धतीने अभ्यासक्रमात बदल घडणे अभिप्रेत आहे.’’ 

संस्थेचे सहसचिव सुरेश प्रताप शिंदे यांनी नवीन येऊ घातलेल्या शैक्षणिक प्रणालीतील मुद्द्यांची चर्चा केली. प्राचार्य डॉ. डी. एस. बोरमने यांनी मनोगत व्यक्त केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Engineers need to get emotional r venkateswaran