Baramati News : सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते 20 हजार झाडे लावणार...

स्वदेशी प्रजातीच्या वृक्षांची लागवड करणे हा या वृक्षारोपण मोहिमेमागील मुख्य उद्देश
engineers of public works department will plant 20 thousand trees environment
engineers of public works department will plant 20 thousand trees environmentesakal

बारामती : पर्यावरणाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने वीस हजारहून अधिक वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागातील सर्व अभियंते व कर्मचारी किमान दहा फूट उंचीची 20000 हून अधिक झाडे लावणार आहेत.

स्वदेशी प्रजातीच्या वृक्षांची लागवड करणे हा या वृक्षारोपण मोहिमेमागील मुख्य उद्देश आहे. यामध्ये वड, पिंपळ, कडूलिंब, सोनचाफा, कदंब, बहावा, आंबा, मोहगणी, कैलासपती या वृक्षांची लागवड केली जाणार आहे. परिसर सुशोभीकरणासह हवेची गुणवत्ता सुधारणा, जैवविविधता संवर्धन व ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम कमी करण्यासह अनेक पर्यावरणीय फायदे यामुळे होतील अशी माहिती मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी दिली.

engineers of public works department will plant 20 thousand trees environment
Baramati News : बारामतीत फळ्याची जागा घेतली स्मार्ट इंटरअँक्टिव्ह टच पॅनेलने

पुणे प्रादेशिक विभागाच्या पाच जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागांच्या कार्यक्षेत्रातील पर्यटन स्थळे, तीर्थक्षेत्रे अशा नागरिकांची वर्दळ जेथे जास्त प्रमाणात आहे, अशा ठिकाणी पाच किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात येणार आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांच्या प्रेरणेने सदाशिव साळुंखे (सचिव, रस्ते) संजय दशपुते (सचिव, बांधकामे) यांच्या मार्गदर्शनाखाली अतुल चव्हाण यांनी या अभियानात पुढाकार घेतला आहे. स्वताः अतुल चव्हाण 1000 झाडे प्रदान करुन, त्यांचे वृक्षारोपण करीत, तीन वर्षे जगविणार आहेत.

engineers of public works department will plant 20 thousand trees environment
Baramati News : बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या न्यू इंग्लिश मीडियम शाळेस इंटरनॅशनल बेस्ट स्कूल अवॉर्ड्सने (ISA) सन्मानित

विभागातील सर्व अभियंत्यांनी देखील वृक्षारोपण व संवर्धन करणार असल्याचा संकल्प केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 22 जुलैपासून या उपक्रमाचा प्रारंभ होणार आहे.

अष्टविनायकातील पहिले स्थान असलेल्या मोरगाव येथे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अधीक्षक अभियंता बप्पा बहिर व कार्यकारी यंत्र अभियंता अनिल ढेपे यांच्या हस्ते वृक्षारोपण केले जाणार असल्याची माहिती शाखा अभियंता खालेद शेख व उपअभियंता रामसेवक मुखेकर यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com