पुणेकरांची, वर्षभर पाण्याची चिंता मिटली! खडकवासला प्रकल्पात 'एवढा' पाणीसाठा

Enough water to supply Pune throughout the year in the Khadakwasla project
Enough water to supply Pune throughout the year in the Khadakwasla project

पुणे :  शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये आज मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत एकूण 18.31 अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा झाला आहे. हे प्रमाण 62.80 टक्के इतके असून, शहराची पिण्याच्या पाण्याची गरज पाहता वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा धरणात उपलब्ध आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

खडकवासला प्रकल्पातील या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात काल रात्री समाधानकारक पाऊस झाला. त्यात टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 40 मिलिमीटर, वरसगाव आणि  पानशेत धरणाच्या क्षेत्रात प्रत्येकी 24 मिलिमीटर तर, खडकवासला धरण क्षेत्रात 17 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

खडकवासला प्रकल्पात गतवर्षी 11 ऑगस्टअखेर 29.15 टीएमसी (100 टक्के) पाणीसाठा होता. यावर्षी ऑगस्ट महिन्यात समाधानकारक पाऊस होत असून, धरणांतील पाणीसाठा जवळपास 63 टक्क्यांपर्यंत पोचला आहे. पुणे शहरातील वाढती लोकसंख्या पाहता दर महिन्याला साधारण दीड टीएमसी पाणी लागते. खडकवासला प्रकल्पात सध्या 18 टीएमसीच्या वर पाणी आहे. त्यामुळे केवळ शहराला पुढील वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा प्रकल्पात सध्या उपलब्ध आहे. मात्र, सिंचनासाठी देण्यात येणारे आवर्तन आणि इतर तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची गरज पाहता आणखी पावसाची आवश्यकता आहे.

प्रवाशांनो, लोहगाव विमानतळावरून रात्रीच्या फ्लाईट्स बंद, कारण...

खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा (टीएमसीमध्ये) कंसात टक्केवारी :
टेमघर 1.63    (43.85)
वरसगाव 7.38    (57.58)
पानशेत 7.39    (69.38)
खडकवासला 1.91    (96.87)

कृष्णा खोऱ्यातील पश्चिम महाराष्ट्रातील कोयना धरणातील पाणीसाठा 70 टीएमसीवर पोचला आहे.‌ तर भीमा खोऱ्यातील सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणातील पाणीसाठा 15 टीएमसीपर्यंत पोचला आहे.

पुणेकरांनो, यंदा बाप्पा येणार तुमच्या दारी !

भीम आणि कृष्णा खोऱ्यातील इतर प्रमुख धरणांतील पाणीसाठा : 
पवना 4.45    (52.28)
डिंभे 5.98    (47.86)
मुळशी 12.19     (66)
नीरा देवधर 6.60    (56.32)
भाटघर 16.29    (69.30)
वीर  8.87     (94.28)
उजनी 14.81    (27.64)
कोयना 70.20    (70.12)
वारणावती 22.72     (82.57)
दूधगंगा 20.78    (86.66)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com