प्रवाशांनो, लोहगाव विमानतळावरून रात्रीच्या फ्लाईट्स बंद, कारण...

night flights from Lohegaon Airport will be canceled Due to runway repairs
night flights from Lohegaon Airport will be canceled Due to runway repairs

पुणे : धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम हवाई दलाने हाती घेतले असल्यामुळे 26 ऑक्‍टोबरपासून लोहगाव विमानतळावरून सकाळी आठ ते रात्री आठ दरम्यानच उड्डाणे होतील. या काळात पुण्यावरून विमानांच्या फेऱ्यांची कमी होणार असून धावपट्टीची लांबीही कमी होणार आहे.लोहगाव विमानतळाच्या धावपट्टीची दुरुस्ती करण्याची चर्चा गेल्या दोन वर्षांपासून सुरू होती. अखेर आता त्याला मुहूर्त मिळाला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लोहगाव विमानतळावर एकच धावपट्टी आहे. तिच्या देखभाल - दुरुस्तीचे काम हवाई दलाकडून 15 सप्टेंबर रोजी सुरू होणार आहे. त्यामुळे 26 ऑक्‍टोबरपासून विमानाच्या उड्डाणांच्या संख्येवर मर्यादा येणार आहेत. धावपट्टीची सध्या लांबी 2530 मीटर आहे. तिच्या दुरुस्तीचे काम सुरू झाल्यावर ही लांबी सुमारे 2133 मीटर होईल. त्यामुळे मोठ्या आकाराची विमाने पुण्यात उतरू शकणार नाही. दुरुस्तीचे काम सुमारे एक वर्षभर चालेला. धावपपट्टीच्या दोन्ही दिशांकडून दुरुस्तीचे काम होणार आहे. पुढील वर्षी एप्रिल - मे दरम्यान लोहगाव विमानतळ 14 दिवसांसाठी बंद ठेवावा लागेल, अशी शक्‍यता अधिकृत सूत्रांनी व्यक्त केली. लोहगाव विमानतळावर हवाई दलाच्या विमानांचाही सराव सुरू असतो. सध्या संध्याकाळी 6 ते पहाटे 3 दरम्यान 15 विमानांची उड्डाणे होतात. 26 ऑक्‍टोबरपासून रात्रीची उड्डाणे बंद होतील. त्यामुळे लोहगाव विमानतळावर ताण येणार आहे.

या बाबत हवाई वाहतूक विश्‍लेषण तज्ज्ञ धैर्यशील वंडेकर म्हणाले, ""लोहगाव विमानतळाच्या धावपट्टीची दुरुस्ती आवश्‍यक आहेच. कारण गेल्या काही काळात विमानांची संख्या वाढली आहे. तसेच 2013 पासून धावपट्टीची दुरुस्ती झालेली नाही. मात्र, लोहगाव विमानतळावर दुरुस्तीला मोठ्या प्रमाणात मर्यादा आहेत. हा विमानतळ संरक्षण दलासाठी आहे. त्यामुळे पुण्यासाठी नव्या विमानतळाची गरज आहे. त्यासाठी तातडीने प्रयत्न व्हायला हवेत. विमान प्रवाशांची संख्या पुण्यातून दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पुरंदर विमानतळावर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे.''

कोरोनाग्रस्तांसाठी बनवलेल्या रुग्णालयाला आग; ०७ जणांचा मृत्यू

कोरोनाच्या लॉकडाउनपूर्वी लोहगाव विमानतळावरून विमानांची दररोज सुमारे 170 उड्डाणे होत असे. रोज सुमारे 25 हजार प्रवाशांची वाहतूक त्यातून होत होती. सध्या 8 शहरांसाठी विमानसेवा सुरू असून 25-30 विमान उड्डाणे होत आहेत. दरम्यान, लोहगाव विमानतळ प्रशासनाने या बाबत विमान वाहतूक कंपन्यांना या बदलाची माहिती दिली. त्यानुसार त्यांनीही त्यांचे नियोजन करणे सुरू केले आहे. या बाबतचा आराखडा ऑगस्टअखेर जाहीर करण्यात येईल, असे एका विमान कंपनीच्या प्रतिनिधीने सांगितले.

तहसीलदार महिलेच्या पतीकडून जीवाला धोका असल्याची 'या' राष्ट्रवादीच्या आमदारांनी केली तक्रार 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com