पुणेकरांनो, यंदा बाप्पा येणार तुमच्या दारी !

Home Delivery Service for ganesh Idol is started in pune
Home Delivery Service for ganesh Idol is started in pune

पुणे : गणपती म्हटलं की पुण्यात ढोल -ताशा, लेझीम, जल्लोष, उत्साह आणि आंनदाचे वातावरण असे चित्र डोळ्यासमोर येते. यंदा मात्र हे चित्र पुर्ण बदलले असणार आहे. कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे सोशल डिस्टसिंग पाळण्यासाठी गणेशोत्सव दरवर्षीसारखा होणार नाही पण, पुणेकरांची गणरायावर खूप श्रध्दा आहे. लाडक्या बाप्पासाठी साधेपणाने का असेना, पण उत्सव नक्की साजरा करतील हे मात्र खरं.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरवर्षी गणरायाची मूर्ती भाविक स्टॉलवर जाऊन बुक करतात. गणेशस्थापने दिवशी नटुन, पांरपारिक पेहरावात बाप्पाला घरी आणण्यासाठी उत्सहात लहान मुले-मोठे सारेच जातात. वाजत-गाजत, 'गणपती बाप्पा मोरया' असे म्हणत बाप्पाला घरी घेऊन येतात. यंदा बाप्पाचे असे स्वागत भाविकांना करता येणार नाही, पण पुणेकरांनो, चिंता करु नका! यावर्षी चक्क बाप्पा तुमच्या घरी येणार आहे. तुमचा विश्वास बसत नसेल पण, होय...असे खरंच होणार आहे.


यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सोशल डिस्टंसिंग पाळण्यासाठी गणरायाच्या मूर्तीची होम डिलिव्हरीची सेवा पुण्यात सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे पुणेकरांनो, तुम्हाला कुठेच जाण्याची गरज नाही...यंदा बाप्पा स्वत:च तुमच्या घरी येणार आहे. त्यामुळे आता फक्त बाप्पाच्या स्वागताची तयारी सुरु करा.  

प्रवाशांनो, लोहगाव विमानतळावरून रात्रीच्या फ्लाईट्स बंद, कारण...

तुम्हाला घरपोच शाडुची गणेश मूर्ती मिळणार आहे, त्यामुळे इको-फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करता येणार आहे.  इतकेच नव्हे तर कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटाईझेशनची योग्य ती काळजी देखील घेतली जाणार आहे.

''यंदा कोरोनामुळे गणेश मूर्ती घरपोच देण्याची सेवा सुरु केली आहे. नागरिक घरबाहेर पडणे टाळत असल्याने होम डिलिव्हरीसाठी चांगला रिस्पॉन्स मिळत आहे.  गणेश मूर्ती बॉक्समध्ये व्यवस्थित पॅक केली आहे. हॅन्डगोल्ज्, मास्क, सॅनिटाईझर याचा वापर करत आहोत. डिलिव्हरी करताना  ग्राहकांना बिल्डिंगच्या खाली बोलावतो, त्यांच्या घरात जात नाही. होम डिलिव्हरीसाठी किलोमीटर अनुसार चार्ज घेत असून पुण्यात सर्व ठिकाणी सेवा देत आहोत. 
- आदित्य भिडे, मूर्तीकार, विक्रेते( श्री गणेश कला क्रिडा केंद्र, सदाशिव पेठ)

''दरवर्षी आमच्याकडे 7-8 गणेश मूर्तींची होम डिलिव्हरी होते, मात्र यंदा कोरोनामुळे नागरिक जास्त होम डिलिव्हरीलाच पसंती देत असून चांगला रिपॉन्स मिळत आहे. होम डिलिव्हरी करताना पीपीई किट घालून, फेस शिल्ड, मास्क वापर केला जातो आहे. पुण्यात कोठेही होम डिलिव्हरीसाठी 200 रुपये चार्ज घेत आहोत.
- हर्षा बोबडे, मूर्तीकार, विक्रेत्या( ओ माय गणेशा, हडपसर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com