मंचरला 'सकाळ माध्यम समूहा'च्या उपक्रमशील शिक्षक पुस्तकाचे प्रकाशन

An enterprising teacher book published by Sakal Media Group was released.jpg
An enterprising teacher book published by Sakal Media Group was released.jpg

मंचर (पुणे) : खेडे गावातील शिक्षकांच्या कार्यकर्तृत्वाची परिपूर्ण माहिती समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम 'सकाळ'ने प्रकाशित केलेल्या 'उपक्रमशील शिक्षक' या पुस्तकाच्या माध्यमातून केले आहे. हे पुस्तक म्हणजे गुरुजनांचा सन्मान आहे. पुस्तक वाचनीय असून शिक्षकांच्या कामगिरीला प्रेरणा व प्रोत्साहन देणारे आहे.' असे माणिकचंद उद्योग समूहाचे अध्यक्ष प्रकाश धारीवाल यांनी सांगितले.
 
मंचर (ता.आंबेगाव) येथे गोवर्धन दूध प्रकल्पाच्या सभागृहात 'सकाळ' माध्यम समूहाने प्रकाशित केलेल्या उपक्रमशील शिक्षक पुस्तकाचे प्रकाशन धारिवाल यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पराग फूड्स लि.चे अध्यक्ष देवेंद्र शहा, आंबेगाव तालुका पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी संचीता अभंग, शिरुर नगर परिषद शिक्षण खात्याचे माजी सदस्य प्रशांत शिंदे, सकाळचे जाहिरात व्यवस्थापक मकरंद पावनगडकर, नयना निर्गुण, सहाय्यक जाहिरात व्यवस्थापक संतोष पोटे, उद्योजक नरेंद्र समदडिया, पप्पू समदडिया, विजयराव पुंगलिया, ललित पारेख उपस्थित होते.
 
धारीवाल म्हणाले, 'गुड मॉर्निंगचे प्रतीक म्हणजे सकाळ आहे. माझ्यासारख्या अनेकांची सुरुवात 'सकाळ' वाचनानेच होते. समाजातील विविध उपक्रमांना नेहमीच साथ देण्याचे काम 'सकाळ 'माध्यमातून झाले आहे. ग्रामीण भागात काम करणाऱ्या शिक्षकांना जिल्हा राज्य पातळीवर नेण्याचे काम सकाळ सतत काम करत आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या लाटेतही यापुढे सकाळ वर्तमान पत्राचे महत्व टिकवूनच राहणार आहे. कारण निवांत वेळी बातमी वाचता येते.'

शहा म्हणले, 'सकाळ मध्यम समूह नेहमीच विधायक उपक्रमात सहभागी होत आहे. कोरोनाच्या काळात मिडियामध्ये भय निर्माण होणाऱ्या बातम्या दाखविल्या जात होत्या. पण त्यावेळी सकाळमाध्यम समूहाने कोरोना हद्दपार करण्यासाठी प्रशासनाने सुरु केलेल्या उपाययोजनांची व समाजाने घेतलेल्या पुढाकाराची परिपूर्ण माहिती देऊन नागरिकांना खऱ्या अर्थाने आधार देण्याचे काम केले. शिक्षकांच्या कार्याची माहिती देणारी पुस्तके सकाळने वेळोवेळी काढावीत. त्यामुळे शिक्षकांना प्रेरणा मिळेल.' उपक्रमशील शिक्षक पुस्तकामागील संकल्पना निर्गुण यांनी सांगितली. सूत्रसंचालन डी.के वळसे पाटील यांनी केले.

आंबेगाव तालुका पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संचिता अभंग म्हणाले, शैक्षणिक क्षेत्रातील उपक्रमांना 'सकाळ'ने नेहमीच पाठबळ दिले आहे. शिक्षकांसाठी प्रथमच पुस्तक काढण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. शिक्षकांच्या कार्याला व्यासपीठ मिळवून देण्याचे काम सकाळने केले आहे. सर्व लेख वाचनीय आहे.
 

संपादन - सुस्मिता वडतिले 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com