‘एन्थुजिया’त ‘सेंट व्हिन्सेंट’ला विजेतेपद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 डिसेंबर 2018

पुणे - डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंटतर्फे (अंडर ग्रॅज्युएट) आयोजित दोनदिवसीय ‘एन्थुजिया’ महोत्सवाचे सर्वसाधारण विजेतेपद कॅम्प येथील सेंटव्हिन्सेंट महाविद्यालयाने पटकावले. विजेत्या महाविद्यालयाला सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्रक व सहभागी विद्यार्थ्यांना पदके देऊन गौरविण्यात आले. पुण्यातील एकूण ७२  महाविद्यालयांनी महोत्सवात सहभाग घेतला.

‘एन्थुझिया’ महोत्सवाच्या पारितोषिक वितरण सोहळ्याला प्रमुख पाहुणे डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. रवीकुमार चिटणीस, उपअधिष्ठाता डॉ. अंजली साने, ‘एन्थुझिया’ समन्वयिका आणि बीबीए इव्हेंट मॅनेजमेंट विभागाच्या प्रमुख प्रा. पल्लवी आद्य, सहसमन्वयिका प्रा. मृदुल वैद्य, तृतीय वर्षाचे विद्यार्थी प्रतिनिधी नौमन शेख व सहकारी उपस्थित होते. सीमा लिमये, यश शेट्टी व धीरज परदेशी यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.

कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, या हेतूने गेल्या आठ वर्षांपासून ‘एन्थुझिया’ महोत्सव वर्षातून दोनदा आयोजिला जातो. यात नृत्य, संगीत, बौद्धिक, व्यवस्थापन, सांस्कृतिक, बॉक्‍स क्रीडा, स्कॅव्हेंजर  हंट, ट्रेजर हंट, कुकिंग, वादविवाद स्पर्धा, सोलो डान्स, ग्रुप डान्स, सोलो सिंगिंग, टग ऑफ वॉर अशा एकूण १७  पेक्षा अधिक प्रकारच्या स्पर्धांचा समावेश असतो. यंदा पुण्यातील ७२ महाविद्यालयांच्या एकूण १३५० विद्यार्थ्यांनी महोत्सवात सहभाग घेतला.

Web Title: Enthusia Mahotsav Saint Vinsent Winner