अंबनेळी घाटात तरुणाच्या अपघाती मृत्युमुळे संपुर्ण अहिरे गाव शोकसागरात

अशपाक पटेल
रविवार, 29 जुलै 2018

खंडाळा : महाबळेश्वर पोलादपुर मार्गावरील अंबनेळी घाटात शनिवारी बस दरीत कोसळुन बस मधील एकजण वगळता सर्वजण मृत्यूमुखी पडले. या मृत्युच्या तांडव्यात अहिरे (ता.खंडाळा) येथील दत्ताराम धोडींबा धायगुडे मृत्युमुखी पडले. यानंतर अहिरे गावात शोककळा पसरली. अतिक्षय मनमिळावु व संयमी स्वभावाचा तरुणावर मृत्युचा घाला पडल्याने संपुर्ण अहिरे गाव शोकसागरात बुडाला.

दत्ताराम धायगुडे हे दापोली कृषी विद्यापीठात लिपीक म्हणून नऊ वर्षापुर्वी रुजु झाले. यानंतर ते  पत्नि, एक पाचवी व चौथीत शिकणारी दोन लहान मुलासोबत दापोलीत राहत होते. यापुर्वी त्यांनी शिरवळ एमआयडीसी मधील गोदरेज गुफ्र लॉकिम कंपनीत आठ वर्ष नोकरी ही केली. यानंतर स्पर्धा परिक्षेतुन दापोली येथे नोकरीस लागले. दापोली येथुन आल्यानंतर नेहमी ते आपल्या मिञपरिवारात व आईवडील कुटुंबात अगदी हसुनखेळुन राहत असत. माञ अचानक ही दुर्दैवी घटना घडल्याने त्यांच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. यांचे वडील कृषी कार्यालयात कामाला होते. सध्या ते सेवानिवृत्त आहेत. एक बंधु प्राथमिक शिक्षक, एक बहीण ग्रामसेविका आहे, तर दुसरी बहिण ही रायगड येथे पति नोकरीला असल्याने वास्तव्यास आहे. अशा संपुर्ण सुक्षक्षित कुटुंबातील सुसंस्कृत तरुण हा मृत्यूमुखी पडल्याने या कुटुंबावर मोठा मानसिक आघात झाला आहे. राञीच दत्ताराम धायगुडे त्यांचे बंधु व मृत दत्तारामचे सासरे मृतदेह ताब्यात घेण्यासाठी पोलादपुरला गेले होते. मयत दत्तारामवर आज अहिरे येथे एक वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
 
Web Title: the entire ahire village in mourning due to accidental death of the youth