सावधान! पुढील १४ दिवसांसाठी दौंडमध्ये 'नो एन्ट्री'; काय आहे कारण?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 जुलै 2020

शहरात दूध विक्रेत्यांना सकाळी ६ ते ९ दरम्यान घरपोच दूध वितरणास परवानगी आहे. किराणा, भाजीपाला, मांस विक्री दुकाने सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंतच सुरू राहतील.

दौंड (पुणे) : दौंड शहरातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण दौंड शहर पुढील चौदा दिवसांकरिता प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. 

- दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांनो, जिओ टी.व्ही. उघडा अन् अभ्यासाला लागा!

दौंड नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश शिंदे यांनी रविवारी (ता.५) ही माहिती दिली. शहरात दूध विक्रेत्यांना सकाळी ६ ते ९ दरम्यान घरपोच दूध वितरणास परवानगी आहे. किराणा, भाजीपाला, मांस विक्री दुकाने सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंतच सुरू राहतील. औषध दुकाने, रूग्णालये, पॅथोलॅाजी लॅब यांना वेळेचे बंधन नाही. शासकीय आस्थापना नियमित वेळेनुसार सुरू राहतील. बॅंका विहित वेळेत सुरू राहतील आणि बॅंकांनी एटीएम यंत्रणा कार्यान्वित ठेवण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. 

- विद्येच्या माहेरघरात घडला धक्कादायक प्रकार; पाचवीच्या अॅडमिशनसाठी मागितले अडीच लाख!

कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना करणारे स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर्मचारी, पोलिस, राज्य व केंद्र शासनाचे कर्मचारी व त्यांची वाहने, वैद्यकीय सेवा आणि अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता अन्य व्यक्ती यांना प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करण्यास आणि परिसरातून बाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दौंड शहरात १ मे ते ५ जुलै या कालावधीत एकूण १५० जणांना कोरोनाची बाधा झाली असून त्यापैकी १०२ जण उपचारानंतर बरे झाले आहेत. सध्या ४१ जण उपचार घेत आहेत. शहराच्या बहुतांश सर्व भागात कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Entire Daund city has been declared a restricted area for the next fourteen days to curb the growing outbreak of coronavirus