esakal | आईच्या स्मरणार्थ उभारले गावासाठी प्रवेशद्वार
sakal

बोलून बातमी शोधा

आईच्या स्मरणार्थ उभारले गावासाठी प्रवेशद्वार

आईच्या स्मरणार्थ उभारले गावासाठी प्रवेशद्वार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चास : पापळवाडी (ता. खेड) येथील बाबाजी शिंदे व राजू शिंदे या दोन भावांनी आपली आई भीमाबाई मारुती शिंदे यांच्या स्मरणार्थ गावासाठी प्रवेशद्वार उभारले आहे.

हेही वाचा: 'युट्युब' पाहून एटीएम फोडणारा मुलगा जेरबंद

आपल्या आईच्या अकाली निधनानंतर ज्ञानदानाचे कार्य करणारे बाबाजी शिंदे व उद्योजक राजू शिंदे आणि त्यांच्या सर्व बहिणी, भाऊ, भावजय व संबंधितांनी वडील मारुती शिंदे यांच्या इच्छेप्रमाणे गावासाठी प्रवेशद्वार देण्याचे ठरवले व निर्धारित वेळेत आकर्षक स्वागत कमान तयार करून तिचे लोकार्पण केले. या प्रवेशद्वाराचा लोकार्पण सोहळा गुरुवारी (ता. ९) आमदार दिलीप मोहिते यांच्या हस्ते झाला.

हेही वाचा: चास-कमान धरणातून पुन्हा विसर्ग सुरू

या वेळी जिल्हा परिषद सदस्या तनुजा घनवट, बाबाजी काळे, राजगुरुनगर बँकेच्या माजी अध्यक्षा विजया शिंदे, पंचायत समितीचे माजी सभापती अंकुश राक्षे, उद्योजक प्रताप ढमाले, सरपंच पुनम शिंदे, रेणुका शिंदे, बहिरवाडीचे सरपंच जगन्नाथ राक्षे, मिरजेवाडीचे बाळासाहेब बुट्टे, शांताराम नेहरे, नारायण करपे, माजी सरपंच नंदकुमार शिंदे, दगडू शिंदे, रंगनाथ चव्हाण, उद्योजक दीपक चव्हाण, मुख्याध्यापक संजय नाईकरे आदी उपस्थित होते.

हेही वाचा: भाटघर धरण काही तासांत भरणार

दरम्यान, या मातोश्रींच्या स्मरणार्थ उभारण्यात येणाऱ्या सार्वजनिक वाचनालयासाठी पंचायत समितीच्या वतीने विशेष तरतूद केली आहे, अशी माहिती माजी सभापती अंकुश राक्षे यांनी दिली. प्राथमिक शिक्षक तुषार वाटेकर यांनी सूत्रसंचालन केले. आत्माराम शिंदे यांनी आभार मानले.

loading image
go to top