पुणे : खंडणी उकळणारांच्या मुसक्या आवळणार

उद्योजक व व्यावसायिकांनी घाबरून जाऊ नये; नांदेड फाटा येथील कार्यक्रमात पोलीस अधिक्षकांचे आवाहन
पुणे :  खंडणी उकळणारांच्या मुसक्या आवळणार
sakal

किरकटवाडी: माथाडी कामगार किंवा इतर संघटनांची भीती दाखवून वाहतूक व्यावसायिक व उद्योजकांकडे पैसे मागणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यात येतील. कोणत्याही उद्योजक किंवा व्यावसायिकाने घाबरून जाऊ नये‌. यापुढे असा प्रकार झाल्यास तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा तातडीने संबंधीतांवर कारवाई करण्यात येईल असे आवाहन पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी उद्योजक व व्यावसायिकांना केले. सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटा येथील सिंहगड इंडस्ट्रीयल असोसिएशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात डॉ देशमुख बोलत होते.

पुणे :  खंडणी उकळणारांच्या मुसक्या आवळणार
शिरोळ तालुक्यात भारत बंदला प्रतिसाद; क्रांती चौकात निदर्शने

मागील काही महिन्यांपासून सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे, नांदेड, धायरी परिसरातील उद्योजक, व्यावसायिक यांना धमकावून पैशांची मागणी होत होती. तसेच मालवाहतूक करणारी वाहने अडवून चालकाला धमकावून पैसे वसूल करण्यात येत होते. पैसे मागणारे माथाडी कामगार संघटनेचे असल्याचे सांगत असल्याने व जमाव करुन येत असल्याने व्यावसायिक व वाहनचालक यांच्यामध्ये भितीचे वातावरण पसरले होते. याबाबत त्रास वाढल्याने सिंहगड इंडस्ट्रीयल असोसिएशनने पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांना दि. 21 सप्टेंबर रोजी निवेदन देऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.

पुणे :  खंडणी उकळणारांच्या मुसक्या आवळणार
सिंबायोसिसतर्फे बुधवारपासून ‘सिम्बिथॉन २०२१’चे आयोजन

व्यावसायिकांमध्ये पसरलेली भीती घालवण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी स्वतः कार्यक्रमाला उपस्थित राहून व्यावसायिकांना मार्गदर्शन केले. कोणीही धमकावत असेल किंवा पैशांची मागणी करत असेल तर तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन डॉ देशमुख यांनी उद्योजक व व्यावसायिकांना केले. यावेळी हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोरेपाटील , पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, सुरक्षा शाखा पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे, सिंहगड इंडस्ट्रीयल असोसिएशनच्या अध्यक्षा पल्लवी जाधव, उपाध्यक्ष जितेंद्र चंपानेरकर, सचिव सुप्रिया जगदाळे, सचिन दांडेकर, योगेश बोराटे, सतीश पाटील यांच्यासह परिसरातील उद्योजक व व्यावसायिक उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com