Pune City News : शहरात अवजड वाहनांना प्रवेशास बंदी

पुणे शहरात अवजड वाहनांना प्रवेशासाठी लावण्यात आले निर्बंध; निर्णयाची अंमलबजावणी होणार शनिवार (ता.२३) पासून.
Heavy Vehicles entry ban in pune city
Heavy Vehicles entry ban in pune citysakal

पुणे - शहरात अपघात आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अवजड वाहनांना प्रवेशासाठी निर्बंध लावण्यात आले आहेत. सोलापूर, अहमदनगर, सातारा, मुंबई, नाशिक, सासवड, पौड, आळंदी रस्त्यांवरून शहरात येणाऱ्या माल वाहतूक ट्रक, डंपर, मिक्सर, बल्कर, जेसीबी, रोड रोलर अशा अवजड वाहनांना प्रवेशास बंदी राहील. त्यातून अत्यावश्यक सेवेतील वाहने, सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या बसेसना वगळण्यात आले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी शनिवार (ता.२३) पासून करण्यात येणार आहे.

अवजड मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांना खालील मार्गाचा वापर करता येईल.

सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत प्रवेश बंद राहील (रात्री १० ते सकाळी ८ वाजेपर्यंत प्रवेश सुरू राहील) -

१. अहमदनगर रस्त्यावरून पिंपरी चिंचवड, मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी खराडी बायपास चौक, शास्त्रीनगर चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, होळकर पूल, पोल्ट्री फार्म चौक, हॅरिस पूल मार्ग.

पर्यायी मार्ग : वाहनचालकांनी शिक्रापूर, चाकण, तळेगावमार्गे इच्छितस्थळी जावे.

२. अहमदनगर रस्त्यावरून साताऱ्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी खराडी बायपास चौक, मगरपट्टा रस्ता, सासवड रस्त्याने मंतरवाडी फाटा चौक, खडी मशिन चौक, कात्रज चौक मार्ग.

पर्यायी मार्ग : वाहनचालकांनी लोणीकंद, केसनंद, थेऊर फाटा मार्गे इच्छितस्थळी जावे किंवा शिरूर, नाव्हरा, केडगाव चौफुला, लोणंद किंवा सुपा, जेजुरीमार्गे इच्छितस्थळी जावे.

३. अहमदनगर रस्त्यावरून सोलापूरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी खराडी बायपास चौक, मगरपट्टा रोड, हडपसर मार्ग. पर्यायी मार्ग : वाहनचालकांनी शिरूर, नाव्हरा, केडगाव चौफुलामार्गे इच्छितस्थळी जावे.

४. सोलापूर रस्त्यावरून साताऱ्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी हडपसर, मंतरवाडी फाटा चौक, खडी मशिन चौक, कात्रज चौक मार्ग बंद राहील. पर्यायी मार्ग : वाहनचालकांनी केडगाव चौफुला, लोणंदमार्गे इच्छितस्थळी जावे.

५. सोलापूर रस्त्यावरून अहमदनगर आणि नाशिककडे जाणाऱ्या वाहनांसाठी हडपसर, मगरपट्टा रस्ता, खराडी बायपास चौक, शास्त्रीनगर चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, होळकर पूल, पोल्ट्री फार्म चौक, हॅरिस पूल मार्ग.

पर्यायी मार्ग : वाहनचालकांनी थेऊर फाटा, थेऊर, केसनंद, लोणीकंद, शिक्रापूर मार्गे इच्छितस्थळी जावे.

या मार्गांवर अवजड वाहनांना २४ तास प्रवेश बंद राहील

- मंगलदास रस्ता -ब्ल्यू डायमंड चौक ते सर्किट हाऊस चौक

- रेंजहिल्स रस्ता- पोल्ट्री फार्म चौक ते रेंजहिल्स कॉर्नर चौक

- सर मानेकजी मेहता रस्ता : काहुन रस्ता जंक्शन ते कौन्सिल हॉल चौक

- पुणे स्टेशन रस्ता- जहाँगीर हॉस्पिटल चौक ते अलंकार सिनेमा चौक

या चौकात अवजड वाहनांना प्रवेश बंद - सकाळी ८ ते ११ आणि दुपारी ४ ते रात्री १० दरम्यान -

संचेती चौक, पौड फाटा चौक, राजाराम पूल, दांडेकर पूल, सावरकर पुतळा चौक, पॉवर हाऊस चौक, पोल्ट्री फार्मचौक, पंडोल अपार्टमेंट चौक, खाणे मारुती चौक, लक्ष्मीनारायण सिनेमा चौक, ब्रेमेन चौक, अभिमानश्री बाणेर चौक, गणेशखिंड रस्ता, आचार्य आनंदऋषीजी (पुणे विद्यापीठ) चौक, सिंफनी सर्कल, कृष्णराव चिमणराव ढोले (सेव्हन लव्हज) चौक, आर.टी.ओ. शाहीर अमर शेख चौक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com