पर्यावरणाच्या समतोलासाठी चुलीऐवजी गॅस वापरा : डॉ. शैला फडतरे

राजकुमार थोरात
शनिवार, 21 एप्रिल 2018

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ग्रामीण भागातील महिलांनी चुलींऐवजी गॅसचा वापर करण्याचे आवाहन पंचायत समितीच्या सदस्या डॉ.शैला फडतरे यांनी व्यक्त केले.

वालचंदनगर : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ग्रामीण भागातील महिलांनी चुलींऐवजी गॅसचा वापर करण्याचे आवाहन पंचायत समितीच्या सदस्या डॉ.शैला फडतरे यांनी व्यक्त केले.

वालचंदनगर (ता.इंदापूर) येथे वालचंदनगर  ग्रामपंचायतीच्या हाॅलमध्ये ‘ उज्वला दिन ’ निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये बोलत होत्या. यावेळी कळंबच्या सरपंच उज्ज्वला फडतरे, कांचन कापडी, ज्योती शहा, डॉ. अस्मिता दामले, रंजना कांबळे, सुरेखा सोनटक्के, अंबादास शेळके, अतुल तेरखेडकर उपस्थित  होते. यावेळी फडतरे यांनी सांगितले, की ग्रामीण भागामध्ये आज ही चुलीवर स्वयंपाक करण्याचे काम सुरु आहे. चुलीवर स्वयंपाक करण्यासाठी झाडांची कत्तल करावी लागत असल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. यामुळे पर्यावरणाचे समतोल बिघडत आहे. धुरामुळे महिलांच्या ही आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होऊन वायू प्रदूषण ही होत असते.

महिलांनी चुलीऐवजी गॅसचा वापर केल्यास असल्याने पर्यावरणाचा समतोल राखण्यास मोलाची मदत होणार असल्याचे सांगितले. यावेळी भारत गॅसचे वितरक चकोर शहा यांनी सांगितले की, महिलांनी गॅस वापरताना योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. रात्री झोपताना व बाहेरगावी जाताना गॅसचा रेग्युलेटर बंद करावा. सिलेंडर नेहमा उभा ठेवावा.

सिलेंडरपेक्षा जास्त उंचीवर गॅस शेगडी असावी. गॅसच्या पाइपकडे लक्ष ठेवावे. घरामध्ये गॅसचा वास आल्यास तातडीने घरातील खिड्या, दरवाजे उघडून काडपेटी व इतर ज्वालाग्रही वस्तूंचा वापर टाळून तातडीने जवळच्या कार्यालयाची संपर्क साधण्याचे आवाहन केले. यावेळी  पंतप्रधान उज्वला गॅस योजनेतंर्गत  महिलांना  गॅस कनेक्शन मोफत वितरण करण्यात आले. 

Web Title: For Environment Stability Use Gas says Shaila Phadtare