Devendra Fadnavis : आमचाच खरं म्हणणाऱ्यांचे ऐकून घेतले जाणार नाही - देवेंद्र फडणवीस

शहरातील प्रकल्पांबाबत पर्यावरणप्रेमींची काही मत आहेत त्याचा मी आदर करतो. त्यांच म्हणणं आम्ही निश्चित ऐकून घेणार आहोत
Environmentalists view regarding projects Devendra Fadnavis development water supply
Environmentalists view regarding projects Devendra Fadnavis development water supply esakal

पुणे : शहरातील प्रकल्पांबाबत पर्यावरणप्रेमींची काही मत आहेत त्याचा मी आदर करतो. त्यांच म्हणणं आम्ही निश्चित ऐकून घेणार आहोत. पण हे करत असताना काही लोकं हे केवळ विकास थांबला पाहिजे या मताचे जे असतात ज्यांच्याकडे कुठलंही लॉजिक नसत, तज्ज्ञ नसतात पण आमचच म्हणणं खरं आहे असा विचार करणार्यांचे आपल्याला ऐकता येणार नाही.

या लाखो पुणेकरांचं जीवनमान जर आपल्याला सुधरवायचं असेल तर महत्त्वाचे निर्णय घ्यावेच लागतील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली. बाणेर बालेवाडी येथील समान पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण, सुस म्हाळूंगे पाणीपुरवठा योजना, कोरेगाव पार्क येथील रेल्वेमार्गावरील साधू वासवानी पूल, आणि सनसिटी ते कर्वे नगर मुठा नदीवरील पूल याचे भूमिपूजन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी फडणवीस बोलत होते.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार माधुरी मिसाळ, भिमराव तापकीर, सुनिल कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुनाल खेमणार, विकास ढाकणे, माजी सभागृह नेते गणेश बीडकर, भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी नगरसेवक अमोल बालवडकर आदी उपस्थित होते.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमात सहभागी झालेल्या विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी पौडपाटा बालभारती रस्ता आणि नदी काठ सुधार प्रकल्प बाबत पर्यावरणवादी नागरिकांची बैठक घ्यावी अशी मागणी या कार्यक्रमात केली त्यावर फडणवीस यांनी भाष्य केले.

फडणवीस म्हणाले, जगामध्ये शाश्वत विकासासाठी ज्या उत्तम कार्यपद्धती आहेत ते आपण स्वीकारल्या पाहिजेत त्याला विरोध करण्याचे काही कारण नाही विकासामध्ये विनाश होऊ नये हे खरे असले तरी काहीजण कमी माहितीच्या आधारावर अर्धवट माहितीवर प्रकल्पाला विरोध करतात त्यामुळे प्रकल्प थांबतो जगाच्या पाठीवर जे प्रकल्प शाश्वत ठरलेले आहेत मग ते आपल्याकडे का होऊ नयेत असा प्रश्न देखील फडणवीस यांनी केला.

पुण्यातील प्रकल्प करताना सर्वांच्या बाजू ऐकल्या जातील पण प्रत्येक गोष्टीला तीन बाजू असतात एक तुमची बाजू एक आमची बाजू पण खरी बाजू समजून घ्यायचे असेल तर तज्ञांचे काय म्हणणे आहे हे जाणून घेतले पाहिजे. म्हणून जे पर्यावरणवादी असतील किंवा ज्या लोकांना पुण्याच्या संदर्भात अतिशय आत्मियता आहे त्यांचे म्हणणं निश्चित ऐकून घेऊ.

पुणे हे केवळ ऐतिहासिक शहर नाही तर हे भविष्यातला शहर देखील आहे. जगाच्या पाठीवर या २१व्या शतकांमध्ये नॉलेज सिटी म्हणून पुणे शहर आहे. महाराष्ट्र देशाच्या उत्पादन क्षेत्रामध्ये 20 टक्क्यांचा वाटेकरी आहे. या मध्ये सिंहाचा वाटा पुण्याचा आहे. त्यामुळे इथली वाढती लोकसंख्या ही विचारात घेता हे शहर राहण्यासाठी योग्य बनले पाहिजे.

शिक्षण, आरोग्य, पर्यावरण या सगळ्या गोष्टींचे मुबलक प्रमाणात उपलब्धता असली पाहिजे. या दृष्टीने पुण्यातील पायाभूत सुविधा मजबूत करण्याचा प्रयत्न आहे . पुण्यामध्ये 27 हजार कोटी रुपये खर्च करून रिंग रोड निर्माण केला जाणार आहे पण या रिंग रोडच्या भोवती तब्बल अडीच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून हा रिंग रोड पुण्याचे ग्रोथ इंजिन असेल असेही फडणवीस म्हणाले.

पुण्याला मुबलक पाणीपुरवठा उपलब्ध असला तरी वितरण व्यवस्थेतील दोषांमुळे पुणे तहानलेले आहे त्यामुळे समान पाणीपुरवठा योजना करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला त्याच्या पहिल्या टप्प्याचे आज उद्घाटन झालेले आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. यावेळी चंद्रकांत पाटील विक्रम कुमार अमोल बालवडकर यांनी मनोगत व्यक्त केले.

- वाहतूक प्रश्न सोडविण्यासाठी मेट्रोचे विस्तारीकरण करणार

- उपनगरे मेट्रोशी जोडल्याने वाहतुकीला चांगले वळण लागेल

- चांदणी चौकातील उड्डाणपूल पूर्ण झाल्याने वाहतूक कोंडी सुटेल

- बाणेर बालेवाडी मधील 15 स्मार्ट सिटी चे प्रकल्प पूर्ण झाले आहेत

- नदीतील पाणी स्वच्छ करण्यासाठी १९०० कोटी रुपये दिले आहेत.

- त्यामुळे एक थेंब घाण पाणी नदीत येणार नाही.

पुण्याचे माझ्यावर प्रेम

चंद्रकांत पाटील यांनी फडणवीस यांनी पुण्याच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख करत त्यांचे कौतुक केले त्यावर फडणवीस म्हणाले, स्वभावाने व जन्माने मी नागपूरकर आहे. कर्माने मुंबईकर आहे. तर विशेष म्हणजे प्रेमाने मी पुणेकर आहे. पुण्याचे माझ्यावर प्रेम आहे व माझेही पुण्यावर प्रेम आहे. पुण्यात अनेक प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन, भूमिपूजनासाठी यायचे म्हटले तर वर्षातून शंभर दिवस मला पुण्यात यावे लागेल, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com