हरियानातील गुडगावमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव

नीला शर्मा
Tuesday, 1 September 2020

हरियानातील गुडगावमध्ये दरवर्षी पाच ते सात दिवस चालणारा गणेशोत्सव यंदा कोरोनापासून बचावासाठीची खबरदारीचा उपाय म्हणून दीड दिवसापुरता मर्यादित स्वरूपात साजरा करण्यात आला. या वर्षी कार्यक्रमही ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आले. या उपक्रमाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. ही माहिती अविनाश जोशी यांनी दिली.

हरियानातील गुडगावमध्ये दरवर्षी पाच ते सात दिवस चालणारा गणेशोत्सव यंदा कोरोनापासून बचावासाठीची खबरदारीचा उपाय म्हणून दीड दिवसापुरता मर्यादित स्वरूपात साजरा करण्यात आला. या वर्षी कार्यक्रमही ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आले. या उपक्रमाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. ही माहिती अविनाश जोशी यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जोशी म्हणाले, ‘‘सार्वजनिक गणेशोत्सव समितीचा यंदा अठ्ठाविसावा उत्सव होता. गुडगाव हे भारतातील तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीचं शहर म्हणून प्रसिद्ध आहे. येथे दोन दशकांपासून मराठी माणसं स्थिरावू लागलेली दिसतात. सुमारे तीन हजारांच्या आसपास येथे असलेली मराठी मंडळी गणेशोत्सवाच्या निमित्ताने एकत्र येतात. माहिती व तंत्रज्ञान, टेलिकॉम तसंच स्वयंचलित वाहन उद्योगांतील नोकरी- व्यवसायामुळे येथे मराठी बांधव येतात. त्यांपैकी बरेचसे चार - पाच वर्षांत परत जातात. येथे स्थायिक झालेले मराठी बांधव तुलनेने कमी आहेत, पण त्यांच्या उत्साहवर्धक आयोजनामुळे गणेशोत्सव स्थानिकांनाही माहीत झाला आहे. समितीकडून चक्क निमंत्रण पत्रिका तयार करून, त्या आदरपूर्वक अनेकांना देऊन स्थानिकांचा सहभाग वाढता ठेवला जातो. येथील विविध सामाजिक संस्था व प्रसिद्धिमाध्यमांकडून मोठ्या प्रमाणात गणेशोत्सवाची दखल घेतली जाते.’

कोरोना रुग्णांसाठी जितो कोविड सेंटर ठरतयं भक्कम आधार

जोशी यांनी असंही सांगितलं की, शहरात विखुरलेले मराठी बांधव या निमित्ताने काही दिवस आधीपासून एकत्र येतात. सामुदायिक केंद्राचं बुकिंग, सांस्कृतिक कार्यक्रम, केटरिंग व्यवस्था, प्रशासनिक परवानगी, प्रायोजक शोधणं आदी अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या वाटून घेतात. पाच वर्षांपासून ‘इकोफ्रेंडली’ उत्सवावर भर असल्याने काही सभासद यात महत्त्वाची भूमिका बजावतात. शाडू मातीच्या गणेशमूर्ती महाराष्ट्रातून मागवून घरगुती गणेशोत्सवासाठी उपलब्ध करून देतात. उत्सवाच्या अखेरीस त्यांचं विसर्जन घरातच केलं जातं. सार्वजनिक गणेशोत्सवातील मूर्तीचं विसर्जन सामुदायिक टाक्‍यात करण्यात येतं. अजून तरी येथील उत्सवात ‘धांगडधिंगा’ शिरलेला नाही. तो शिरू नये यासाठी जुने सभासद दक्ष असतात. स्थानिक मंडळींचा सहभाग दरवर्षी वाढताना दिसतो. त्यांपैकी बरेचजण हा उत्सव त्यांनाही घरी कसा करता येईल, याची तपशीलवार माहिती करून घेतात.
(समाप्त)

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Environmentally friendly Ganeshotsav in Gurgaon Haryana