Hoarding : संभाजी चौकीमागे नियमाचे उल्लंघन करून महाकाय होर्डिंगची उभारणी

पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात टिळक चौकात संभाजी पोलिस चौकीच्या मागे नियमबाह्यपद्धतीने तीन होर्डिंगचे एकत्रीकरण करून महाकाय होर्डिंग उभारले आहे.
Hoarding
Hoardingsakal

पुणे - शहराच्या मध्यवर्ती भागात टिळक चौकात संभाजी पोलिस चौकीच्या मागे नियमबाह्यपद्धतीने तीन होर्डिंगचे एकत्रीकरण करून महाकाय होर्डिंग उभारले आहे. त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केलेच, पण यासंदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्यानंतर त्यासही विलंब लावला जात आहे.

होर्डिंग उभारण्यासंदर्भात राज्य सरकारने नियमावली निश्‍चीत केलेली आहे. त्यानुसार महापालिकेच्या आकाश चिन्ह विभागातर्फे संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडून परवानग्या दिल्या जातात. पण अनेकदा कागदावर सगळे योग्य असले तरी प्रत्यक्षात नियमांचे उल्लंघन केलेले असते. असाच प्रकार शहराच्या मध्यवर्ती भागात समोर आला आहे.

टिळक चौकात संभाजी पोलिस चौकीच्या मागे आकाशचिन्ह विभागाने तीन होर्डिंगला परवानगी दिली. या प्रत्येक होर्डिंगमध्ये नियमानुसार तीन मीटरचे अंतर ठेवणे बंधनकराक होते, पण त्याकडे दुर्लक्ष करत सलग होर्डिंग उभारले आहेत. हे काम सुरू असताना आकाशचिन्ह विभाग आणि कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांकडून, कर्मचाऱ्यांकडून दुर्लक्ष करण्यात आले आहे.

‘नदीच्या काठी होर्डिंग उभारणी करताना ती जागा सुरक्षीत आहे की नाही याचा स्टॅबिलिटी रिपोर्ट आवश्‍यक आहे. तसेच होर्डिंग उभारताना तीन मीटरचे अंतर आवश्‍यक आहे. त्याचा अहवाल मागविला आहे. तो अद्याप प्राप्त झालेला नाही. पण तेथे संबंधित व्यावसायिकास जाहिरात न लावण्याचे आदेश दिले आहेत.’

- डॉ. कुणाल खेमणार, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

दुर्लक्ष करणाऱ्यांवर कारवाई

होर्डिंग उभारताना नियमांचे पालन होत आहे की नाही यावर आकाश चिन्ह विभागाच्या अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी, परिमंडळाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवणे आवश्‍यक होते. पण या प्रकरणात सर्वांचेच दुर्लक्ष झाल्याने त्यांच्यावर देखील कारवाई होणार होईल असेही खेमणार यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com