esakal | अवाजवी बिल आकरण्याबाबत विभागीय आयुक्‍त सौरभ राव म्हणतात...
sakal

बोलून बातमी शोधा

rao.jpg

-खासगी रुग्णालयांच्या बिलांमध्ये त्रुटी, 50 लाखांच्या बिलांची बचत 
-विभागीय आयुक्‍त सौरभ राव यांची माहिती 

अवाजवी बिल आकरण्याबाबत विभागीय आयुक्‍त सौरभ राव म्हणतात...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना बाधित रुग्णांकडून अवाजवी बिल आकारण्याच्या तक्रारींची शहानिशा करून बिलांची रक्‍कम कमी करण्यात आली. त्यामुळे सुमारे 50 लाखांच्या बिलांची बचत झाली आहे. तसेच, मृत्यूदर कमी करण्यासाठी व्याधीग्रस्त, ज्येष्ठ नागरिकांच्या सर्वेक्षणावर भर देण्यात येत असल्याची माहिती विभागीय आयुक्‍त सौरभ राव यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

अवाजवी बिल आकरण्याच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी खासगी रुग्णालयाने दीड लाखांपेक्षा अधिक बिल दिल्यास त्याची पूर्व तपासणी करण्यात येत आहे. बिलांच्या लेखापरीक्षणासाठी लेखापरीक्षक आणि उपजिल्हाधिकारी यांची पथके नेमली आहेत. पुणे महापालिका क्षेत्रातील खासगी रुग्णालयांनी जादा बिल आकारल्याच्या 102 तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी 65 बिलांमध्ये त्रुटी आढळून आल्या. तसेच, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील रुग्णालयांच्या 30 बिलांची तपासणी करण्यात आली. त्या सर्व बिलांची तपासणी करून बिले कमी करण्यात आली. ग्रामीण भागातील खासगी रुग्णालयांच्या तपासणीसाठीही पथके तयार करण्यात येणार आहेत. 

राव म्हणाले, मृत्यू दराचे प्रमाण कमी करण्यासाठी व्याधीग्रस्त 20 हजार नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात 922 जण बाधित आढळले. त्यांच्यावर वेळीच उपचार करणे शक्‍य झाले. जम्बो कोविड रुग्णालयामुळे बेड्‌सची संख्या पुरेशी झाली आहे. सध्या कोणीही रुग्ण वेटिंगवर नाही. दुसरे जम्बो रुग्णालयही सुरू होत असून, त्यात सहाशे ऑक्‍सिजन बेड्‌स आणि दोनशे आयसीयू बेड्‌स उपलब्ध होतील. 

पुणे विभागात 5381 रुग्णांचा मृत्यू - 
पुणे विभागातील बाधित रुग्णांची संख्या दोन लाख 948 इतकी झाली आहे. त्यापैकी एक लाख 45 हजार 719 रुग्ण बरे झाले आहेत. तर, पाच हजार 381 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या उपचार घेणाऱ्या बाधित रुग्णांची संख्या 49 हजार 848 इतकी आहे. विभागात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 72.50 टक्‍के आहे. तर, मृत्यूचे प्रमाण 2.75 टक्‍के आहे. 

पुणे-नाशिक रेल्वेसाठी भूसंपादन- 
पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पासाठी एक हजार 470 हेक्‍टर जमीन संपादन करावी लागणार आहे. हा प्रकल्प पुणे जिल्ह्यातील हवेली, खेड, जुन्नर आणि आंबेगाव तालुक्‍यातून जाणार आहे. त्यामुळे तेथील भूसंपादन करावे लागणार आहे. त्यासाठी सुमारे दीड हजार कोटी रुपये लागतील, असे विभागीय आयुक्‍त राव यांनी सांगितले.

loading image
go to top