पॉलिटेक्निकच्या प्रश्नपत्रिकेत चुका

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 मे 2019

पुणे : तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रमाच्या परीक्षा सध्या सुरू आहेत. यात सिविल इंजीनिअरिंग अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षातील (चौथे सत्र) "बिल्डींग प्लॅनिंग ड्रॉईंग' विषयाचा पेपर सोमवारी झाला. या विषयाच्या प्रश्‍नपत्रिकेत दोन प्रश्‍नांमध्ये चुका झाल्याचे निदर्शनास आले आहे. 

राज्य तंत्र शिक्षण मंडळातर्फे नवीन अभ्यासक्रमानुसार परीक्षेचे यंदाचे हे पहिले वर्ष आहे. सिविल इंजीनिअरिंगच्या (पदविका) चौथ्या सत्रातील प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍न क्रमांक तीन आणि सहामध्ये गोंधळ झाल्याचे दिसून आले आहे. हे दोन्ही प्रश्‍न सोडविण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या आकृत्या (डिझाइन) प्रश्‍नपत्रिकेत उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना हे प्रश्‍न सोडविता आले नाहीत. एकूण 70 गुणांच्या या प्रश्‍नपत्रिकेत प्रत्येकी बारा गुणांसाठी विचारण्यात आलेले हे प्रश्‍न अर्धवट असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे एकूण 24 गुण हे अंधातरीच राहत आहेत. 

विद्यार्थ्यांनी यासंदर्भात संबंधित महाविद्यालयांमध्ये तक्रारी केल्या आहेत. महाविद्यालयांमार्फत तंत्र शिक्षण मंडळाला प्रश्‍नपत्रिकेतील चुकीबाबत कळविण्यात आले आहे. त्याशिवाय टिचर्स असोसिएशन ऑफ नॉन एडेड पॉलेटेक्‍नीकच्या वतीनेही प्रश्‍नपत्रिकेत झालेली चुक मंडळाच्या निदर्शनास आणून दिली असल्याचे असोसिएशनचे सचिव श्रीधर वैद्य यांनी सांगितले. राज्यातील जवळपास 25 हजार विद्यार्थ्यांनी ही विषयाचा पेपर सोमवारी दिला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Errors in 'Polytechnic' question paper