वारजे माळवाडीत 'गावरान खाद्य महोत्सव'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जानेवारी 2018

खडकवासला :  महिला बचत गट आणि महिला उद्योजिकांनी बनविलेल्या खास व अस्सल ग्रामीण खाद्य पदार्थांची मेजवानी दि २६, २७ आणि २८ जानेवारी २०१८ असे तीन दिवस वारजेकरांना मिळणार आहे. या महिलांच्या वस्तू पदार्थांना बाजारपेठ मिळवून देणार आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकाराने होत असलेल्या या गावरान खाद्य महोत्सवामध्ये मालवणी, सावजी स्पेशल, कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा, गावरान तुपातील मटन चिकन, मटका बिर्याणी, बोंबील भजी, मासे असे नॉन व्हेज पदार्थांची आणि मासवडी, शेंगोळे, हुलग्यांचे माडगे, खान्देशी मांडे, उकडीचे मोदक, जळगावी वांग्याचं भरीत, बेसन भाकरी, ज्वारी, बाजरी, मका, नागली, कळण्याची भाकरी, कढी, ताक सोलकढी, सोलापुरी चटण्या, पापड, माठातील लोणचे अशा व्हेज खाद्य पदार्थांची रेलचेल असणार आहे. 

यशस्विनी सामाजिक अभियानाच्या माध्यमातून होणारा हा महोत्सव वारजे माळवाडी येथील सिंहगड काॅलेज मैदान, आदित्य गार्डन सोसायटी जवळ येथे दि. २६, २७, २८ जानेवारी २०१९ दरम्यान, स. ११ ते रा. १० वाजेपर्यंत भरणार आहे. याचा सर्व पुणेकरांनी लाभ घ्यावा. असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

Web Title: esakal marathi new food festiveal pune supriya sule women