जुन्नर- घरात घुसलेल्या सहा फूट नागास शिताफीने पकडले

दत्ता म्हसकर
बुधवार, 16 ऑगस्ट 2017

जुन्नर : शिरोली बुद्रुक ता.जुन्नर येथील प्रसाद थोरवे यांच्या घरात घुसलेल्या सुमारे सहा फूट लांबीच्या नागास जुन्नर येथील सर्प मित्र आकाश उर्फ गोट्या परदेशी याने आज दि.16 रोजी सकाळी मोठया शिताफीने पकडले. नागास पकडल्याने घरातील सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

आकाश परदेशी याने आता पर्यंत विषारी व बिनविषारी असे दीड हजाराहून अधिक साप पकडले असून यात 70 टक्के  नाग,घोणस यासारखे विषारी साप होते तर 30 टक्के बिनविषारी असल्याचे परदेशी याने सांगितले. पकडलेले साप पुन्हा जंगलात सोडून दिले असून साप पकडत असताना दोनदा विषारी सापाने दंश केला होता मात्र वेळीच उपचार झाल्याने जीवावरील संकटातून वाचलो आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. 

Web Title: esakal news sakal news junnar news

टॅग्स