नोकरदारांसाठी सरकारने घेतला मोठा निर्णय; बेरोजगार भत्त्यामध्ये केली दुप्पट वाढ!

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 22 September 2020

पूर्वी मिळणारा सरासरी पगाराच्या 25 टक्के भत्ता देण्यात येत होता. आता मात्र तो 50 टक्के करण्यात आला आहे.

पुणे : कोरोना काळात नोकरी गमावलेल्या नोकरदारांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 'अटल बीमीत व्यक्ती कल्याण योजने'अंतर्गत इएसआयसीने बेरोजगार भत्त्यामध्ये दुप्पट वाढ केली आहे. दोन वर्षे नोकरी करून 24 मार्च ते 30 जून 2021 दरम्यान बेरोजगार झालेल्या कामगारांना ही वाढ देण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठी संबंधित कर्मचारी 'इएसआयसी'मध्ये नोंदणीकृत असणे आवश्‍यक आहे.

'फर्स्ट इयर' सुरू होणार नोव्हेंबरपासून; 'यूजीसी'नं वेळापत्रक केलं जाहीर!

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जे कामगार बेरोजगार झाले त्यांच्यासाठी नियम शिथिल करून ही वाढ देण्यात येत आहे. सुरवातीला 31 डिसेंबर 2020 पर्यंतच ही योजना लागू करण्यात आली होती. पूर्वी मिळणारा सरासरी पगाराच्या 25 टक्के भत्ता देण्यात येत होता. आता मात्र तो 50 टक्के करण्यात आला आहे. हा भत्ता जास्तीत जास्त 90 दिवसांचा असेल आणि तो नोकरीवरून काढून टाकल्यानंतर 30 दिवसांनी दिला जाणार आहे.

यंदा नवरात्र उत्सवात रास-दांडिया नाहीच; तरुण-तरुणींच्या आनंदावर फेरले पाणी​

या योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगारांनी आपला अर्ज www.esic.in या संकेतस्थळावर लॉगइन करून भरावा. त्यानंतर त्याची प्रिंट, आधार कार्ड, पासबुक किंवा चेकच्या प्रतीसह आपल्या जवळच्या 'इएसआयसी'च्या कार्यालयामध्ये जमा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
रोजगार गमावणाऱ्यांना या योजनेअंतर्गत सरकारकडून मदत मिळते. हा एक प्रकारे बेरोजगारी भत्ता असतो. याचा लाभ त्याच कर्मचाऱ्यांना मिळतो, ज्याच्या मासिक पगारातून 'इएसआय' योगदान कापले जाते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ESIC doubles unemployment allowance