राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या मूल्यमापनासाठी समितीची स्थापना

मिलिंद संगई
बुधवार, 4 जुलै 2018

बारामती (पुणे) : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या कामकाजाचे मूल्यमापन करणे व त्यात गुणात्मक सुधारणेसाठी राज्य शासनाने साखर संचालकांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली आहे. 

राज्य शासनाच्या धोरणांचे उल्लंघन करुन निर्णय घेतल्याने अनेक सहकारी संस्था आर्थिकदृष्टया अडचणीत आल्या आहेत. या मुळे अशा सहकारी संस्थांचे मूल्यमापन करुन त्यांच्या कारभारात गुणात्मक सुधारणा करण्यासाठी समितीची स्थापना करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधिन होता. 

त्या नुसार साखर संचालक (अर्थ) ज्ञानदेव मुकणे यांच्या अध्यक्षतेखाली साखऱ संचालक (प्रशासन) शैलेश कोथमिरे, प्रादेशिक सहसंचालक सचिन रावळ, सहसंचालक साखर (प्रशासन) राजेश सुरवसे व सहसंचालक साखर (अर्थ) मंगेश तिटकारे अशा पाच जणांच्या समितीची स्थापना शासनस्तरावरुन करण्यात आली आहे. 

संस्था स्थापनेच्या उद्देशपूर्तीची पाहणी, अडचणी सोडविण्यासाठी उपाययोजना, संस्थाना दिलेले शासकीय अर्थसहाय्य व त्याचा केलेला विनियोग व झालेली वसूली, संस्थांनी केलेले उल्लेखनीय कार्य, संस्थेमुळे झालेली रोजगारनिर्मिती, कामकाजात आढळून आलेली अनियमितता, त्रुटी व गैरव्यवहार, अनियमतता व गैरव्यवहार प्रकरणी विभागाने केलेली कारवाई, अवसायनात गेलेल्या संस्थांचे पुनर्जिवन करण्याच्या उपाययोजना, संस्थांच्या कामकाजात गुणात्मक वाढ होण्यासाठीची उपाययोजना, सहकार चळवळीच्या व्यापक हिताच्या दृष्टीने शासन स्तरावर करायचे धोरणात्मक निर्णय या मुद्यांवर या समितीला कामकाज करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. सदर समितीने दोन महिन्यात आपला अहवाल सादर करण्यासही त्यांना सांगण्यात आले आहे.

Web Title: Establishment of committee for evaluation of co-operative sugar factories in the state