दौंडला कोरोना रोखण्यासाठी अखेर नियंत्रण कक्ष स्थापन

daund
daund

दौंड (पुणे) : दौंड तालुक्यात कोरोनाबाधितांचा आकडा सहाशेच्या पार गेल्यानंतर आणि मृतांची संख्या वाढू लागल्याने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहे. शहरातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये हे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले असून, त्याचा दूरध्वनी क्रमांक 02117262342 असा आहे.

दौंडचे तहसीलदार संजय पाटील यांच्याकडे पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या अध्यक्षा वैशाली नागवडे यांनी नियंत्रण कक्ष सुरू करण्यासंबंधी लेखी मागणी केल्यानंतर सदर कक्ष सुरू करण्यात आले आहे. दौंड तालुक्यात २९ एप्रिल ते १० ऑगस्ट या कालावधीत एकूण ६४४ जणांना बाधा झाली आहे. तर, उपचारानंतर ४९२ जण बरे झाले आहेत. शहरातील १५ व ग्रामीण भागातील ९, अशा एकूण २४ नागरिकांचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
                    
दौंड तालुक्यात दौंड, यवत, स्वामी चिंचोली येथे कोविड केअर सेंटर सुरू आहेत. तर, तालुक्यातील काही खासगी रूग्णालये अधिग्रहित करण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थापन करण्यात आलेला नियंत्रण कक्ष २४ तास कार्यान्वित राहणार आहे. नियंत्रण कक्षाचे नोडल अधिकारी म्हणून सहकारी संस्थांचे सहायक निबंधक मिलिंद टांकसाळे (99226 12614) यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर, शिक्षण विस्तार अधिकारी गोरक्षनाथ हिंगणे (94203 97171) व उप शिक्षक विश्वनाथ शिंदे (94222 25890) यांची सहायक नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. 

पुण्यात डबेवाल्यांवरच आली उपासमारीची वेळ
                   
नियंत्रण कक्षात 02117262342 या क्रमांकावर येणाऱ्या कॅालची नोंद करून संबंधितांना पुढील कार्यवाहीसाठी कळविणे, कोविड केअर सेंटर व डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमधील रिक्त बेडची माहिती अद्ययावत करणे, बाधित रूग्णांचे समुपदेशन व मार्गदर्शन करणे, सर्वेक्षणाची माहिती घेणे, आदी कामकाज प्रामुख्याने केले जात आहे. नोडल व सहायक नोडल अधिकारी यांना साह्य करण्याकरिता प्रत्येकी सहा तासांच्या चार सत्रांसाठी एकूण बारा शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com