महिलांच्या 'सखी सुगरण क्रिएटीव्ह ग्रुपचे हळदीकुंकू

creative.jpg
creative.jpg

बारामती शहर : सोशय मिडीयाच्या नकारात्मक बाजूबद्दलच हल्ली अधिक बोलले जाते, मात्र याची सकारात्मक बाजू बारामतीच्या महिलांनी एकत्र येत समाजासमोर आणली आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून एकमेकींच्या मैत्रीणी झालेल्या शंभरहून अधिक महिलांनी नुकतेच एकत्र येत 'सखी सुगरण क्रिएटीव्ह ग्रुप'ची स्थापना केली. या महिलांचे पहिले गेट टु गेदर व हळदीकुंकू बारामती क्लब येथे पार पडले.
 
केवळ गप्पाटप्पांसाठी एकत्र येण्यापेक्षाही महिलाशक्तीला एकत्र करुन त्यातून काहीतरी विधायक घडविण्याच्या उद्देशाने आनंदी निबंधे व त्यांच्या सहकारी महिलांनी विचारांचे आदानप्रदान व्हावे व त्यातून महिलांना एक व्यासपीठ मिळावे या उद्देशाने या ग्रुपची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. आज या समूहामध्ये तब्बल सातशेहून अधिक महिला कार्यरत आहेत. बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, नगरपालिका महिला बालकल्याण समितीच्या सभापती शारदा मोकाशी  यांच्या उपस्थितीत या ग्रुपचे औपचारिक उदघाटनही झाले. 

धार्मिक रूढी जपायच्या म्हणून हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले गेले नाही, तर त्या निमित्ताने व्यवस्थापन कौशल्य, कलाकुसर, वैचारिक देवाणघेवाण व्हावी, वेगवेगळया रेसिपींची माहिती व्हावी तसेच घऱगुती छोटे व्यवसाय करणाऱ्य़ा सहकारी महिलांचीही ओळख व्हावी, या निमित्ताने एकत्र यावे या उद्देशाने हा कार्यक्रम केला गेला. आनंदी निबंधे छोटासा घरगुती व्यवसाय करतात, त्यांनी बारामती परिसरातील अनेक महिलांना व्हॉटसअँप ग्रुप मध्ये सहभागी करुन घेत एकत्र आणले. 

गेल्या काही महिन्यांमध्ये कलागुणांचे दर्शन घडविणाऱ्य़ा संगीता म्हेत्रे (उत्कृष्ट सुगरण), स्वाती ढोबळे (उत्कृष्ठ किचन), दर्शन जैन (उत्कृष्ट कस्टमर सर्व्हिस), रुपाली खटके (उत्कृष्ट थीम), अंजली गुंजेकर (उत्कृष्ट साडी), अनघा एखंडे (पोस्टर रांगोळी) लुबना पठाण (मेंदी), वृषाली ढोरगे (उत्कृष्ट फराळ), स्नेहा गांधी (घरगुती पापड), उज्वला थोरात (अँप्रिसिएशन), माधवी भक्ते (शिवणकाम) यांचा या प्रसंगी सत्कार केला गेला. 

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी  लता जगताप,  दर्शना जैन, संगीता म्हेत्रे, स्वाती ढोबळे, अर्चना दोशी , राधिका घोळवे, वृषाली वाघुले यांचे विशेष सहकार्य लाभले. सूत्रसंचालन सोनाली कट्टे यांनी केले,  अर्चना दोशी यांनी आभार मानले.

महिलांना व्यासपीठ देण्याचा प्रयत्न
मीही एक गृहिणीच आहे. व्हॉटसअँप ग्रुपच्या माध्यमातून महिला एकत्र येत गेल्या, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी या ग्रुपची स्थापना केली. महिलांच्या विचारांचे आदानप्रदान या माध्यमातून होत असून त्याचा फायदा सर्वच महिलांना होत आहे
- आनंदी निबंधे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com