सुमारे 4 हजार किमीचा प्रवास केला सायकलने!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

सहकारनगर : शाहू महाविद्याल पर्वती येथील अभिजित गवळी व सायली महाराव या दोन विद्यार्थ्यांनी अरुणाचल प्रदेश ते गुजरात असा 3900 किलोमीटरचा सायकल चालवण्याचा प्रवास 32 दिवसांत पूर्ण केला. यावेळी फ्लॅस्टिक वापर करू नये व महिला सशक्तीकरण असा संदेश देत अरुणाचल प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान व गुजरात या सात राज्यांतून सायकलप्रवास केला.

आज दुपारी सायकलप्रवास पूर्व करून स्वारगेटला आल्यानंतर सारसबाग येथील गणेश मंदिरात स्वारगेट पोलिस व भाजप झोपडपट्टी आघाडीच्या वतीने या दोन विद्यार्थ्यांचे स्वागत करून सत्कार करण्यात आला. यावेळी स्वारगेट पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कदम, पोलिस निरीक्षक मच्छिंद्र पंडित, झोपडपट्टी आघाडीचे शहर अध्यक्ष जीवन माने, भाजप पर्वती अध्यक्ष हरीष परदेशी, गणेश शेरला, किरण वैष्णव, शेखर वाघ, बाळासाहेब शेलार, दिव्या लोवगे, दीपक डोंगरे, किरण गायकवाड, संगीत गवळी, बाळू गवळी उपस्थित होते. 

अरुणाचल प्रदेश ते गुजरात हा माझा पहिलाच सायकलिंग प्रवास होता. सात राज्यातून प्रवास करताना आनंद झाला. सर्व स्तरावर आमचे स्वागत केले गेले. रोज 120 ते 130 किलोमीटर अंतर पार करीत होतो. आमच्या या प्रवासाला महाविद्यालयातील लेफ्टनंट शेरूमल शेंडे, प्राचार्या शोभा इंगवले आणि सरचिटणीस प्रमिला गायकवाड यांचे मार्गदर्शन मिळाले.

- अभिजित गवळी (टीवाय,बीसीए) 

प्रथम काश्मीर ते कन्याकुमारी चार हजार किलोमीटर अंतराचा सायकल चालवणे असा प्रवास अवघ्या 35 दिवसांत पूर्ण केला होता. अरुणाचल प्रदेश ते गुजरात हा प्रवास दुसऱ्यांदा पूर्ण केला. यामध्ये महाविद्यालयाच्या प्राचार्या, शिक्षक व प्रमिला गायकवाड याचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. आई वडिलांच्या आशीर्वादाने एवढा मोठा सायकल प्रवास सुखद झाला आणि घरच्यांच्या पाठिंब्यामुळे हे यश संपादन करता आले.

- सायली महाराव (एसवाय,बीए) 

Web Title: Estimated 4 thousand km travel by bicycling