इथेनॉल निर्मिती साखर उदयोगास नवसंजीवनी देणारे- हर्षवर्धन पाटील

इथेनॉल निर्मितीबाबतचे केंद्र व राज्यसरकारचे धोरण साखर उदयोगास नवसंजीवनी देणारे ठरणार- माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील
इथेनॉल निर्मिती साखर उदयोगास नवसंजीवनी देणारे- हर्षवर्धन पाटील
sakal

इंदापूर : महात्मा फुलेनगर बिजवडी ( ता. इंदापूर ) येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ३६ व्या वार्षिक सर्व साधारण सभेत कारखान्याच्या शेअर्स ( भाग दर्शनी ) मुल्याची किंमत १० हजार वरुन १५ हजार रुपये करण्यास मंजूरी देण्यात आली तसेच वाढीव ५ हजार रुपये दोन हप्त्यामध्ये वसूल करण्यास सभेव्दारे मान्यता देण्यात आली.

इथेनॉल निर्मिती साखर उदयोगास नवसंजीवनी देणारे- हर्षवर्धन पाटील
मेडिकल कॉलेजला हवा मनुष्यबळाचा ‘बुस्‍टर’

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व देशाचे पहिले सहकारमंञी अमित शहा यांनी पुढील पाच वर्षासाठी पेटोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे धोरण ठरवून साखर उद्योगास नवसंजीवनी दिल्याबद्दल कारखाना संचालक मंडळ, सभासदांच्या वतीने त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. अहवाल सालात मरण पावलेल्या सर्वमान्यवर तसेच सभासदांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

कोविड १९ पार्श्वभूमीवर व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे कारखाना सभागृहात राज्याचे माजी सहकार मंत्री तथा कारखाना अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या सभेपुढील सर्व विषय खेळीमेळीच्या वातावरणात मंजूर झाले. सभेच्या सुरुवातीस कर्मयोगी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष,दिवंगत खासदार शंकरराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन माजी मंत्रीतथा कारखाना अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, पुणे जिल्हामध्यवर्तीसहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी कारखान्याचे विदयमान संचालक मंडळ उपस्थित होते. यावेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले, कोरोना महामारीमुळे सर्वत्र अर्थकारण ठप्प झाले असून त्याचा फटका साखर उद्योगास देखील बसला आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारचे इथेनॉलचे धोरण कारखान्यांना वरदान ठरणारे आहे. पद्माताई भोसले म्हणाल्या, कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष शंकरराव पाटील यांनी सहकार केंद्रबिंदू मानून सभासद व परिसराचे आर्थिक परिवर्तन केले. त्यांच्या विचारांचा वारसा घेवून कारखाना चालवला जात आहे.

आप्पासाहेब जगदाळे म्हणाले, पूर्वी खाजगी असलेला हा कारखाना सहकाराच्या माध्यमा तून दिवंगत खासदार शंकरराव पाटील यांनी सभासद मालकीचा बनविला.त्यामुळे राज्यात पहिल्या दहा मध्ये येण्यासाठी सभासदांनी संचालक मंडळास सहकार्य करावे. विषयवाचन, स्वागत व प्रास्ताविक कार्यकारी संचालक देवराव लोकरे यांनी तर सुत्रसंचलन कार्यालयीन अधीक्षक शरद काळे यांनी केले .आभार प्रदर्शन संचालक प्रशांत सुर्यवंशी यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com