

युरोपमध्ये महागाई, बेरोजगारी व सरकारी धोरणांविरोधात हजारो नागरिक रस्त्यावर उतरत आहेत. यंदाच्या वर्षी युरोपीय युनियन (ईयू) मधील २७ देशांत जवळपास २२ हजार निदर्शने करण्यात आली. फ्रान्समध्ये सर्वाधिक असंतोष असून या देशात सर्वाधिक निदर्शने करण्यात आली. युरोपीय युनियनमध्ये सर्वाधिक आंदोलने फ्रान्समध्ये झाली. फ्रान्सखालोखाल जर्मनीत आंदोलनाची तीव्रता आहे.
ऑक्टोबरमध्ये या देशांत निदर्शने
फ्रान्स, इटली, जर्मनी, अल्बानिया, स्पेन, ग्रीस, बेल्जियम, सर्बिया
फ्रान्समधील निदर्शने
७,३००
सहभागी विद्यार्थी/नागरिक
३.२ लाख
जर्मनीत जेन झी रेजिस्ट संघटनेच्या आवाहनानंतर ३४ शहरांत निदर्शनात एक लाखापेक्षा अधिक युवक सहभागी
युरोपीय देशांतील हिंसक निदर्शने
फ्रान्स ९५०
ग्रीस ७५
स्वीडन ७०
ब्रिटन ६०
जर्मनी ४५
विविध देशांतील स्थिती
फ्रान्स : पुढील वर्षी होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापण्याची शक्यता. लोकांच्या मागण्या पूर्ण करण्याचा सत्ताधाऱ्यांवर दबाव
जर्मनी ः देशात दोन ते सहा नोव्हेंबर दरम्यान आणखी निदर्शने शक्य. याशिवाय १४ नोव्हेंबरला कामगार संघटनांची संपाची हाक.
स्पेन : ११ नोव्हेंबर रोजी मोठ्या संपाची तयारी
ब्रिटन : महागाई, आर्थिक समस्येमुळे २० नोव्हेंबरला मोठ्या आंदोलनाची तयारी
का भडकला युरोप?
महागाई आणि वाढता खर्च : युरोपातील अनेक देशांत लोक महागाई, बेरोजगारी, कमी वेतन आदींमुळे त्रस्त आहेत. रशिया-युक्रेन युद्धानंतर इंधनाच्या खर्चात मोठी वाढ झाली असून त्याचा परिणाम सामान्य नागरिकांवर होत आहे.
इराण युद्धाचा परिणाम : अमेरिका-इराणमधील युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने जानेवारीत दोन टक्के असलेला महागाई दर सप्टेंबरमध्ये ८.२ टक्क्यांवर गेला. या काळात कच्च्या तेलात ४९.५ टक्के तर गॅसच्या किमतीत १४० टक्के वाढ झाली. बेरोजगारांच्या संख्येतही एका वर्षात ३३ टक्के वाढ झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.