पुणेकरांच्या जीवनशैलीचे मूल्यांकन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 मे 2018

पुणे - देशातील ११६ शहरांचे जीवनशैली मूल्यांकन केले जाणार असून, यात पुणे शहराचाही समावेश आहे. त्यासाठी महापालिका प्रशासन सध्या माहिती गोळा करण्याचे काम करीत आहे. केंद्रीय नगर विकास खात्यामार्फत दरवर्षी हे मूल्यांकन केले जाणार आहे. 

परदेशांत अशा प्रकारचे मूल्यांकन केले जात असते. तेथील काही संस्थांनी भारतातील विविध शहरांचे मूल्यांकन केले असून, केंद्र सरकारने पुढाकार घेऊन प्रथमच अशा प्रकारची योजना राबविण्याचे ठरविले आहे. फेब्रुवारी महिन्यात नगर विकास खात्याने देशातील ११६ शहरांचे जीवनशैलीचे मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला. 

यात महाराष्ट्रातील १२ शहरांचा समावेश असून, त्यात पुण्याचाही समावेश आहे. प्रशासन व्यवस्था, आरोग्य आणि शिक्षण, सांस्कृतिक वारसा, आर्थिक स्थिती, प्रदूषण, जमिनीचा वापर, सार्वजनिक वाहतूक, मोकळ्या जागा, अत्यावश्‍यक नागरी सुविधांची स्थिती अशा प्रमुख १५ मुद्यांचा विचार या मूल्यांकनात केला जाणार आहे. यामध्ये सुमारे ७९ निकषांच्या आधारे त्याची तपासणी होणार आहे.

महाराष्ट्रातील शहरे 
बृहन्मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, पिंपरी- चिंचवड, नाशिक, सोलापूर, नागपूर, वसई-विरार, औरंगाबाद, अमरावती

काय होणार उपयोग?
 नागरिकांचे जीवनमान उंचाविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा प्राधान्यक्रम ठरविणे 
 केंद्र सरकारचे धोरण ठरविण्यासाठी यातील निष्कर्षांचा आधार घेणार 
 दरवर्षी प्रत्येक शहरांची तपशीलवार माहिती उपलब्ध होईल

Web Title: Evaluation of the lifestyle Pune people