कर्जासाठी आवश्‍यक प्रक्रिया पूर्ण करूनही मिळाले नाही कर्ज; काय आहे प्रकार वाचा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 15 October 2020

कर्जासाठी आवश्‍यक असलेली कागदपत्रे आणि रक्कम देऊनही तक्रारदाराला कर्ज न देणाऱ्या मे. इन लाईफस्टाईल सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला अतिरिक्त जिल्हा ग्राहक आयोगाने दंड ठोठावला आहे. कर्जासाठी भरलेल्या रकमेसह 79 हजार 531 रुपये आठ टक्के व्याजाने परत देण्यात यावेत. तसेच शारीरिक आणि मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून दहा हजार रुपये आणि तक्रारीचा खर्च म्हणून पाच हजार रुपये देण्याचा आदेश आयोगाने दिला आहे.

पुणे - कर्जासाठी आवश्‍यक असलेली कागदपत्रे आणि रक्कम देऊनही तक्रारदाराला कर्ज न देणाऱ्या मे. इन लाईफस्टाईल सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला अतिरिक्त जिल्हा ग्राहक आयोगाने दंड ठोठावला आहे. कर्जासाठी भरलेल्या रकमेसह 79 हजार 531 रुपये आठ टक्के व्याजाने परत देण्यात यावेत. तसेच शारीरिक आणि मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून दहा हजार रुपये आणि तक्रारीचा खर्च म्हणून पाच हजार रुपये देण्याचा आदेश आयोगाने दिला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अतिरिक्त जिल्हा ग्राहक आयोगाचे अध्यक्ष जे. व्ही. देशमुख, सदस्य अनिल जवळेकर, शुभांगी दुनाखे यांनी हा निकाल दिला.

या प्रकरणी रघुनाथ हरिश्‍चंद्र पवार (रा. फुरसुंगी) यांनी माय मनी मंत्रा आणि मे. इन लाईफस्टाईल सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. तक्रारदाराने कर्ज घेण्यासाठी माय मनी मंत्राच्या प्रतिनिधीकडे संपर्क साधला. त्यांना दोन लाख रुपयांचे कर्ज देण्याचे आश्वासन देण्यात आले. हे कर्ज मिळण्यासाठी तक्रारदाराला विम्यापोटी 19 हजार 532 रुपये भरावे लागतील, असे सांगण्यात आले. तक्रारदाराने ही अट मान्य करीत कर्जासाठी लागणारी प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर त्यांना पुन्हा 29 हजार रुपये लाईफस्टाईल लिमिटेडच्या खात्यात जमा करण्यास सांगण्यात आले.

Pune Rain:पुण्यात आज काय घडतंय? परीक्षा पुढे ढकलल्या, महापालिकेची हेल्पलाईन सुरू

तक्रारदाराने ही रक्कम देऊनही त्यांना कर्ज मिळाले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी ग्राहक आयोगाकडे तक्रार केली. तक्रारदाराने पैसे मे. इन लाईफस्टाईल सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या खात्यात जमा केले आहे. नोटीस बजावूनही ते मंचासमोर हजर झाले नाहीत, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Breaking : मुसळधार पावसाचा फटका; पुणे विद्यापीठाचे आजचे पेपर पुढे ढकलले 

लाईफस्टाइल लिमिटेडच्या संचालकाला अटक -
माय मनी मंत्राकडून लेखी म्हणणे सादर करण्यात आले. कर्जदारांची कागदपत्रे घेऊन संबंधित संस्थेला देणे एवढेच त्यांचे काम आहे. माय मनीच्या नावाने फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर त्यांनी याबाबत पोलिसांकडे फिर्याद दाखल केली. या प्रकरणी लाईफस्टाइल लिमिटेडच्या संचालकाला अटक करण्यात आली असल्याचे त्यांनी आयोगास सांगितले.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Even after completing required process loan do not get it