esakal | अरे बापरे ! लॉकडाऊननंतरही बारामतीत रुग्णसंख्या कमी होईना...
sakal

बोलून बातमी शोधा

corona patient.jpg

लॉकडाऊन सुरु करुन आता पाच दिवसांचा कालावधी उलटूनही बारामतीची कोरोना रुग्णांची प्रतिदिन शतकी मजल कमी होताना दिसत नाही. गेल्या 24 तासात बारामतीत 122 रुग्ण आढळले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.

अरे बापरे ! लॉकडाऊननंतरही बारामतीत रुग्णसंख्या कमी होईना...

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : लॉकडाऊन सुरु करुन आता पाच दिवसांचा कालावधी उलटूनही बारामतीची कोरोना रुग्णांची प्रतिदिन शतकी मजल कमी होताना दिसत नाही. गेल्या 24 तासात बारामतीत 122 रुग्ण आढळले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली. जितके रुग्ण आढळले आहेत तितकेच म्हणजे 119 जणांचे अहवाल अद्याप प्रतिक्षेत असल्याने आज काळजी अधिकच वाढली आहे. बारामतीच्या रुग्णसंख्येची वाटचाल दोन हजारांच्या दिशेने वेगाने सुरु आहे.

पुणेकरांनी काळजी घेण्याचे महापालिकेचे आवाहन; रोजच्या तपासणीत 28 टक्के कोरोनाबाधित

 
संपर्क कमी करण्यात प्रशासनाला यश मिळालेले असले तरी रुग्णसंख्या मात्र झपाट्याने वाढू लागल्याने आता प्रशासनही काळजीत पडले आहे. रुग्णसंख्या कमी होण्यास काही कालावधी लागेल असे सांगितले जात असले तरी गेल्या काही दिवसातील प्रतिदिन शतकी आकडा कधी कमी होणार असाच प्रश्न निर्माण झाला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


बारामतीत आता दरदिवशी चारशेहून अधिक तपासण्या नियमितपणे होत असल्याने रुग्णसंख्याही झपाट्याने वाढू लागली आहे. एक रुग्ण पॉझिटीव्ह आढळल्यानंतर त्याच्या संपर्कातील किमान पाच ते दहा जण चाचणीसाठी येत असल्याने चाचणी करणा-यांची संख्याही झपाट्याने वाढू लागली आहे. अर्थात रुग्णांचा आकडा 100 ते 125 च्या दरम्यान राहतो आहे. त्यात गुणाकार होत नाही ही एक दिलासादायक बाब असल्याचे वैद्यकीय व्यावसायिकांचे मत आहे. हा आकडा कमी होईल पण त्याचा वेग कमी असेल. 

दृष्टीक्षेपात बारामतीचा आढावा
•    आजपर्यंतची एकूण रुग्ण संख्या- 1889
•    उपचाराखाली असलेले रुग्ण- 663
•    आजपर्यंत कोरोनाने मृत्यूमुखी पडलेले रुग्ण- 52
•    पॉझिटीव्ह असलेले मात्र लक्षणे नसलेले रुग्ण- 519
•    सौम्य लक्षणे असलेले रुग्ण- 391
•    मध्यम लक्षणे असलेले- 74
•    ऑक्सिजनवर असलेले रुग्ण- 50
•    व्हेंटीलेटरवर असलेले रुग्ण- 29
•    बरे झालेले रुग्ण- 781

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दाखल रुग्णांची दवाखानानिहाय स्थिती खालील प्रमाणे
•    रुई ग्रामीण रुग्णालय- 25
•    सिल्व्हर ज्युबिली रुग्णालय- 87
•    शासकीय वैद्यकीय महाविद्यालय- 245
•    नटराज नाट्य मंडळ कोविड सेंटर- 100
•    बारामती हॉस्पिटल- 41
•    विविध खाजगी रुग्णालय- 81
•    घरी विलगीकरणातील रुग्ण संख्या- 470
•    पुणे येथे उपचार घेत असलेले रुग्ण- 7