गरिबांच्या घासातही श्रीमंतांना हवाय वाटा...

meal
meal
Updated on

चाकण (पुणे) : लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर गोरगरीब, परप्रांतीय, मजूर, कामगार, भाडेकरू यांना अन्नधान्याच्या किटचे स्वयंसेवी संस्था व इतर लोकांकडून वाटप केले जात आहे. हे अन्नधान्याचे किट मिळविण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. यात सोशल डिस्टन्सिंग ठेवले जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. तसेच, किट मिळविण्यासाठी गोरगरिबांच्या रांगेत काही श्रीमंत, मध्यमवर्गीयसुद्धा आहेत. त्यामुळे श्रीमंत झाले गरीब, असे चित्र निर्माण झाले आहे. 

खेड तालुक्‍यात चाकण, आळंदी, राजगुरुनगर व इतर गावांत गोरगरीब मजुरांसाठी अन्नधान्याच्या किटचे वाटप केले जात आहे. त्यासाठी अनेक जण प्रयत्न करतात. या किटमध्ये गव्हाचा आटा, तांदूळ, तेल, साखर, मसाले, कांदा, बटाटा आदी वस्तू आहेत.

पुण्याच्या इतर सविस्तर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

काही कंपन्यांच्या वतीनेही वाटप करण्यात येत आहे. किट मिळविण्यासाठी काही श्रीमंत व मध्यमवर्गीयही, "मी गरीब आहे,' असे सांगून किट मिळविण्यासाठी धडपड करत आहेत. काही बोगस नागरिकांनाही किटचे वाटप होत आहे. काहींनी तर चार ते पाच किट मिळविले आहेत. गोरगरिबांऐवजी काही श्रीमंत लोकांनाच किट मिळत आहे. 

गरजवंतांची मात्र धडपड 
हातावर पोट असणाऱ्या काही लोकांची, गरीब व मजुरांची मात्र किट मिळविण्यासाठी धडपड होत आहे. हे गरीब लोक पोलिस ठाणे, नगरपरिषद, ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय या ठिकाणी किट मिळवण्यासाठी चकरा मारत आहेत. पण, किट देण्याच्या यादीत नाव नसल्याने या लोकांचे मात्र हाल होत आहेत. किट देण्याच्या यादीत वशिल्याने काहीजण आपल्या लोकांची नावे टाकत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com