
पुणे : ‘‘मतचोरीचा मुद्दा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे. मात्र त्याऐवजी सायंकाळी सहानंतर झालेल्या मतदानाचा मुद्दा हाती घेणे आवश्यक होते. सायंकाळी सहानंतर झालेल्या मतदानाची कोणतीही माहिती नाही. सध्या देशात सर्वसमावेशक नेतृत्व नाही. जे नेतृत्व आहे ते पक्षीय आहे. त्यामुळे परिस्थिती गंभीर होत आहे,’’ असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.