सोलापुरात सामान्य माणूसच भाजपचाच झाला आहे : चंद्रकांत पाटील

प्रविण डोके
सोमवार, 22 जुलै 2019

सोलापुरात सामान्य माणूसच भाजपचाच झाला आहे. कोणी कुठे ही जावा आम्ही भाजपलाच मतदान करणार

पुणे : सोलापुरात सामान्य माणूसच भाजपचाच झाला आहे. कोणी कुठे ही जावा आम्ही भाजपलाच मतदान करणार. सोलापुरात काहीही झालं तरी कितीही भांडणे झाले तरी तेथील माणसे भाजपला मतदान करणार असे म्हणतात, असे भाजप पदाधिकाऱ्यांना मार्गदशन करताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

पाटील म्हणाले, पुढील पाच वर्षामध्ये गुणात्मक बदल करायला हवेत. या तीन वर्षांमध्ये आपल्याला आपली संस्कृती जपायची आहे. माझ्याकडे तीन वर्ष आहेत. चांगलं काम केले तर अजून तीन वर्ष भेटतील.

राजस्थान, गुजरात, मध्ये प्रदेश येथे संघटन मजबूत आहे. मध्य प्रदेशात बहुमताला तीन जागा कमी पडल्या, काँग्रेसपेक्षा तिथे भाजपला दीड लाख मते जास्त आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आपल्याला महाराष्ट्रात संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत, असेही पाटील यावेळी म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Every common in Solapur is With BJP Says Chandrakant Patil