सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी सर्वांनी आग्रह धरायला हवा - सुभाष देशमुख

कृष्णकांत कोबल
बुधवार, 9 मे 2018

आजच्या काळात लग्न कार्यासाठी होणारा लाखो रुपयांचा खर्च केवळ अनाठायी आहे. त्यातून अनेक गरीब कुटुंबे कर्जबाजारी होत आहेत. त्यास सामुदायिक विवाह सोहळा चांगला पर्याय असून कुटुंबातील व्यक्तींबरोबरच वधु-वरांनींही त्यासाठी अग्रह धरला पाहिजे, असे मत राज्याचे पणन व सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले.

 

 

मांजरी : आजच्या काळात लग्न कार्यासाठी होणारा लाखो रुपयांचा खर्च केवळ अनाठायी आहे. त्यातून अनेक गरीब कुटुंबे कर्जबाजारी होत आहेत. त्यास सामुदायिक विवाह सोहळा चांगला पर्याय असून कुटुंबातील व्यक्तींबरोबरच वधु-वरांनींही त्यासाठी अग्रह धरला पाहिजे, असे मत राज्याचे पणन व सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले.

भारतीय जनता पक्ष, शिवसेना, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती व क्रांती मित्र मंडळ यांच्या वतीने सर्व धर्मीय मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी वधु वरांना शुभेच्छा देताना देशमुख बोलत होते.
 आमदार योगेश टिळेकर यांनी सामुदायिक विवाह सोहळ्याचे संयोजक बाळासाहेब घुले, प्रतिक घुले यांनी सलग पाच वर्षे हा उपक्रम यशस्वी राबवल्या बद्दल विशेष सत्कार केला. 

कात्रज दुध संघाचे संचालक गोपाळ म्हस्के, जिल्हा परिषद सदस्या वंदना कोद्रे, बाजार समिती उपसभापती भूषण तुपे, सरपंच शिवराज घुले, अमित घुले, रमेश घुले, पुरुषोत्तम धारवाडकर, सुभाष जंगले, शैलेंद्र बेल्हेकर, शशिकला वाघमारे, कृष्णा घुले, रत्नमाला घुले, आदी यावेळी उपस्थित होते.

 गेल्या पाच वर्षांपासून मांजरी बुद्रुक येथे हा विवाह सोहळा आयोजित केला जात आहे. यावर्षी सोहळ्यात अकरा जोडपी विवाहबद्ध झाली. यावेळी
 देशमुख म्हणाले, "सामुदायिक विवाह सोहळ्याच्या आयोजनासाठी संपूर्ण राज्यात जनजागृतीची आवश्यकता आहे. गरीब कुटुंबातील मुलामुलींचे शुभविवाह लोकवर्गणीतून सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून लावले तर खर्च वाचून गरीबांचा संसार उभा राहील. समाजाने याकडे सकारत्मकतेने पाहायला हवे."

Web Title: everybody should intrest in Community Wedding Ceremony says minister deshmukh