भोर, शिरूरमध्ये ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड

evm
evm

पुणे : शिरूर तालुक्यातील उरळवागाव व भोर तालुक्यातील खानापूर येथील मतदान केंद्रांतील ईव्हीएम मशिनमध्ये झालेल्या बिघाडामध्ये काही काळ मतदान प्रक्रिया बंद पडली होती. वेळीच नवीन मशिन आणल्यामुळे सुमारे तासाभरानंतर मतदान प्रक्रिया सुरळीत झाली. 

शिरूर तालुक्‍याच्या पूर्व भागातील उरळगावात एक तास ईव्हीएम मशिन बंद पडल्याने नागरिकांना एक तास ताटकळत बसावे लागले. नवीन ईव्हीएम मशिन आणल्यानंतर एक तासाने मतदान सुरू झाले. 

शिरूर तालुक्‍याच्या पूर्व भागातील रांजणगाव सांडस, आलेगाव पागा, आरणगाव, दहिवडी, पारवडी, राक्षेवाडी, शिवतक्रार म्हाळुंगी आदी परिसरातील गावामध्ये सकाळी सात ते नऊ वाजल्याच्या दरम्यान मतदान केंद्रावर शुकशुकाट जाणवत होता. मात्र, सकाळी नऊ वाजल्यापासून दोन वाजेपर्यंत मतदारांची गर्दी कमी प्रमाणात दिसून आली. मात्र, दुपारच्या नंतर परत गर्दी वाढली. 

खानापूर (ता. भोर) येथील मतदान केंद्रातील व्हीव्हीपॅट मशिन बंद पडल्याने मतदारांच्या रांगा लागल्या. प्रशासनाने त्वरित हालचाली करून पंधरा मिनिटांमध्ये नवीन व्हीव्हीपॅट मशिन बसविले आणि मतदान प्रक्रिया पुन्हा सुरू केली. 

खानापूर येथे सकाळी दहा वाजून 21 मिनिटांनी मशिन बंद पडल्याने मतदान प्रक्रिया थांबविण्यात आली. घटनेची माहिती मिळताच झोनल ऑफिसर अनिल लांडगे यांनी त्वरित दुसरे व्हीव्हीपॅट मशिन नेऊन बसविले, परंतु तोपर्यंत मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. दहा वाजून 35 मिनिटांनंतर नवीन व्हीव्हीपॅट मशिनवर मतदान प्रक्रिया सुरू झाली. परंतु दुपारपर्यंत मतदारांच्या रांगा लागलेल्या होत्या. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com