खंडणी प्रकरण : मंगलदास बांदल उपचारासाठी ससूनमध्ये दाखल

Mangaldas-Bandal
Mangaldas-Bandal

पुणे : खंडणीच्या प्रकरणात अटकेत असलेल्या मंगलदास बांदल यास घशात त्रास होऊ लागल्याने मंगळवारी (ता.१) ससूनमध्ये दाखल करण्यात आले. रुग्णालयाने सोडल्यानंतर बांदल यास न्यायालयात हजर केले जाणार आहे.

सराफी व्यावसायिकाकडे ५० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी बांदल यास पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ व खंडणी विरोधी विभागाने अटक केली होती. त्यानंतर बांदल यास न्यायालयाने 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला होता.

दरम्यान, बुधवारी पोलिस कोठडी संपणार असल्याने मंगळवारी नियमितपणे होणाऱ्या वैद्यकीय तपासणीसाठी बांदल यास ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर डॉक्टरांनी बांदल यास घशात त्रास होत असल्याचे कारण पुढे करून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करून घेतले.

याविषयी अंमली पदार्थ व खंडणी विरोधी विभागाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते म्हणाले, "बांदल यास नियमित वैद्यकीय तपासणीसाठी ससूनमध्ये नेले होते. त्यावेळी डॉक्टरांनी त्यास घशात त्रास होत असल्याने उपचारासाठी दाखल केले आहे. त्यांनी सोडल्यानंतर त्यास न्यायालयात हजर केले जाईल."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com