कोरोनाविरुद्धच्या लढाईत माजी सैनिकांनीही चढवली वर्दी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

देशाच्या रक्षणासाठी लढा दिलेल्या माजी सैनिकांनीही आपली वर्दी चढवून कोरोनाविरुद्धच्या लढाईत सहभाग घेतला आहे. जिल्ह्यातील दीड हजारांहून अधिक माजी सैनिक विविध ठिकाणी संरक्षण आणि नागरिकांना जीवनावश्यक वस्तू पुरवण्याची जबाबदारी पार पाडत आहेत.

पुणे - देशाच्या रक्षणासाठी लढा दिलेल्या माजी सैनिकांनीही आपली वर्दी चढवून कोरोनाविरुद्धच्या लढाईत सहभाग घेतला आहे. जिल्ह्यातील दीड हजारांहून अधिक माजी सैनिक विविध ठिकाणी संरक्षण आणि नागरिकांना जीवनावश्यक वस्तू पुरवण्याची जबाबदारी पार पाडत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील पुरंदर, बारामती, भोर, वेल्हा, जुन्नर येथे माजी सैनिक चेक पोस्टवर संरक्षणासाठी जबाबदारी बजावत आहेत. तसेच जीवनावश्यक वस्तू पुरविण्याची दुहेरी भूमिका पार पाडत आहेत. 

कोरोनामुळे मेट्रोचे 50 टक्के कामगार पळाले; पुणे मेट्रो प्रकल्प लांबणार!

माजी सैनिकांकडून योगदान -
 - बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील आजी माजी सैनिक संघटनेच्यावतीने 88 हजार रुपयांची मदत आणि अन्नधान्यांचे संकलन

- बारामती पोलिस दलास सहकार्य, पुरंदर येथे कोरोनाबाधित रुग्णाला रक्ताचा तुटवडा कमी पडू नये यासाठी रक्तदान

- टाकळी गावात 30 हजार रूपये जमा करून गावातील नागरिकांना मदत 

- जय जवान आजी माजी सैनिक संघटनेच्यावतीने ‘पोलिस व माजी सैनिक साथ साथ’ कोरोनाविरोधी मोहीम, भोर तहसीलदारांकडे 25 हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द

-  कोरोना विषाणूपासून काळजी घेण्याबाबत
नागरिकांना शिस्तीचे धडे 

- जुन्नर येथील माजी सैनिक संघटनेच्यावतीने पीएम केअर्स आणि मुख्यमंत्री सहायता निधीत 65 हजार रुपये

- इंदापूर तालुक्यातील पळसदेव ग्रामपंचायत आणि माजी सैनिक यांच्या समन्वयाने चौकशी कक्ष.

महाराष्ट्रातील एकूण 9 हजार 814 माजी सैनिकांचा सहभाग. त्यापैकी सर्वाधिक 1 हजार 587 माजी सैनिक पुणे जिल्ह्यातील आहेत. 

कोरोनाविरुद्धच्या लढाईत पोलिस, महसूल, महापालिका, आरोग्यसेवक, स्वयंसेवक, सेवाभावी संस्था कार्यरत आहेत. त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी माजी सैनिक पुन्हा मैदानात उतरले आहेत. त्यामुळे  पोलिसांवरील कामाचा ताण कमी होण्यास मदत होत आहे. 
- मेजर मिलिंद तुंगार, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ex servicemen also ware uniforms in the battle against Corona