मुक्तादेवी विद्यालयाला 40 इंची सहा टीव्ही भेट (व्हिडिओ)

चंद्रकांत घोडेकर
सोमवार, 3 डिसेंबर 2018

घोडेगाव (पुणे) नारोडी (ता. आंबेगाव) येथील श्री. मुक्तादेवी विद्यालयात 1987 मधील दहावीच्या तुकडीचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. माजी विद्यार्थ्यांनी शाळेला 40 इंची 6 स्मार्ट टीव्ही देण्याचे ठरविले आणि स्नेह मेळाव्यात ते मुख्याध्यापक एस. व्ही. शिंदे यांच्याकडे सुपूर्त केले.

या वेळी माजी प्राचार्य आर. व्ही. भोसले, माजी शिक्षक एस. व्ही. कातोरे, पी. एन. बाणखेले, एस. बी. असवरे, श्‍याम उबाळे, डी. जी. आवटे यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी आर. व्ही. भोसले यांनी नारोडी गावात घडलेली एक विनोदी कथा सांगितली. या वेळी माजी विद्यार्थी मारुती हुले, सुनीता शिंदे, दत्तात्रय हुले, नामदेव डोके, निवृत्ती हुले, राजू हुले, संजय पिंगळे, विठ्ठल हुले, रोशन मोरे, द्वारका घोडेकर, मोहन जंबुकर यांनी मनोगत व्यक्त केले. माजी विद्यार्थ्यांचा सत्कार मुख्याध्यापक एस. व्ही. शिंदे यांनी केला. प्रास्ताविक व आभार "सकाळ'चे बातमीदार चंद्रकांत घोडेकर यांनी केले.

दरम्यान, विद्यालयाला दरवर्षी काहीना काही भेट देण्याचा संकल्प या वेळी विद्यार्थ्यांनी केला. दरवर्षी वर्गणी गोळा करून हा संकल्प पूर्ण केला जाणार आहे.

Web Title: Ex Students gift smart tv to muktadevi vidyalay at ghodegaon