

PAT Exam Disrupted in Pune Due to Question Paper Shortage
sakal
पुणे : शिक्षण विभागाच्या प्रोग्रेसिव्ह असेसमेंट टेस्टसाठी (पॅट) शाळांना विद्यार्थी संख्येच्या तुलनेत अपुऱ्या प्रश्नपत्रिका मिळाल्याचे पुन्हा समोर आले आहे. शनिवारपासून (ता. ११) परीक्षा सुरू होत असून, प्रश्नपत्रिकांचा तुटवडा असल्याने परीक्षा कशी घ्यायची, असा प्रश्न शाळांसमोर निर्माण झाला आहे. राज्यात ११, १५ आणि २२ एप्रिलदरम्यान इयत्ता दुसरी ते आठवीसाठी ‘पॅट-३’अंतर्गत संकलित चाचणीचे आयोजन केले आहे.